Monday, May 8, 2023
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी Bandhkam Kamgar nondani Maharashtra
Monday, November 7, 2022
बांधकाम कामगार योजना व नोंदणी याबाबत सविस्तर माहिती
- १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार
- मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार
- नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
- वयाचा पुरावा
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- रहिवासी पुरावा
- ओळखपत्र पुरावा
- पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
मंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे…बांधकाम कामगार नोंदणीसाठी खालील काम करणारे कामगार पात्र असतील.“बांधकाम व इतर बांधकाम कार्य म्हणजे याचा संबंध निर्माण करणे, बदलणे, दुरुस्ती करणे, देखभाल करणे किंवा नाश करणे…- इमारती,
- रस्त्यावर,
- रस्ते,
- रेल्वे,
- ट्रामवेज
- एअरफील्ड,
- सिंचन,
- ड्रेनेज,
- तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स,
- स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह,
- निर्मिती,
- पारेषण आणि पॉवर वितरण,
- पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे
- तेल आणि गॅसची स्थापना,
- इलेक्ट्रिक लाईन्स,
- वायरलेस,
- रेडिओ,
- दूरदर्शन,
- दूरध्वनी,
- टेलीग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन्स,
- डॅम
- नद्या,
- रक्षक,
- पाणीपुरवठा,
- टनेल,
- पुल,
- पदवीधर,
- जलविद्युत,
- पाइपलाइन,
- टावर्स
- कूलिंग टॉवर्स
- ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्य,
- दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे.,
- लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे.,
- रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम.,
- गटार व नळजोडणीची कामे.,
- वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे.,
- अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
- वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
- उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे.,
- सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे.,
- लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे.,
- जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे.,
- सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम.,
- काच कापणे, काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे.,
- कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे.,
- सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे.,
- स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे.,
- सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे.,
- जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे.,
- माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे.,
- रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी.,
- सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकाम.
नोंदणी फी- रू. 25/- व वार्षिक वर्गणी रू.60/- (5 वर्षाकरिता) व मासिक वर्गणी रु.1/-
ऑफलाईन अर्जाचा नमुना mahabocw worker registration offline form खालील लिंक वर मिळेल
Mahabocw worker registration offline form
बांधकाम कामगार योजना चा अर्ज कसा करायचा हे देखील पहाBandhkam Kamgar Yojana शैक्षणिक योजना
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना १ ली ते ७ वी साठी प्रतिवर्षी रू.२५००/- किंवा इ.८ वी ते १० वी साठी प्रतिवर्षी रू.५००
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ५०% किंवा अधिक गुण मिळाल्यास रू.१०,०००/-
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता ११ वी व १२ वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी रू.१०,०००/-
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस पदवी च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी रू. २०,०००/-
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी रू.१,००,०००/- व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता रू.६०,०००/
नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा पहिल्या दोन पाल्यांना शासनमान्य पदविकेकरिता प्रतिवर्षी रू.२०,०००/- व पदव्युत्तर पदविकेकरिता रू.२५,०००/-
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण MSCIT करिता शुल्काची प्रतिपूर्ती. -
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास रू.५,००,०००/-.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रू.२,००,०००/-
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराला घरखरेदी किंवा घरबांधणीकरता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील रू.६ लक्ष पर्यतच्या व्याजाची रक्कम अथवा रू.२ लक्ष अनुदान.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधी करिता रू. १०,०००/-.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस रू.२४,०००/- (५ वर्षांकरिता) ,(प्रति वर्षी अर्ज करणे आवश्क्य राहील).
Friday, July 17, 2020
अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी डहाणू ते चर्चगेट लोकल
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पहाटे ४.४० वाजता डहाणू ते चर्चगेट लोकल सोडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. शुक्रवारपासून (१७ जुलै) ही फे री सेवेत येईल. यासाठी काही लोकल फेऱ्यांच्या वेळेत व अंतिम स्थानकात बदल केले आहेत.
पश्चिम रेल्वेच्या पालघर, डहाणू, वैतरणा, बोईसर या भागांतून मुंबईच्या दिशेने पहाटेच्या सुमारास मेमू व लोकल चालवण्यात येतात. परंतु पहाटे ५ वाजताची डहाणू ते बोरीवली मेमू गाडी ही ५.४० वाजता डहाणू ते विरार लोकल म्हणून चालवण्यात येत आहे. त्यामुळे विरारला उतरुन पुन्हा मुंबईच्या दिशेने लोकल पकडावी लागते. परिणामी कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होतो. अनेक परिचारिका, वॉर्डबॉय यांनी ही वेळ आणि लोकलचे अंतिम स्थानक बदलण्याची मागणी केली होती. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही हीच मागणी उचलून धरली. त्यानुसार हा बदल करण्यात येत आहे.
१७ जुलैपासून पहाटे ४.४० वाजता डहाणू ते विरार अशी गाडी चालवली जाईल, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकू र यांनी सांगितले. त्यानंतर पहाटे ५.४० वाजता डहाणू रोड ते विरार गाडी असेल. त्याआधीही पहाटे ४.१५ वाजता विरार ते डहाणू रोड आणि सकाळी ७.४० वाजता चर्चगेट ते डहाणू रोड गाडी चालवण्यात येणार आहे. पहाटेच्या ४.४० च्या लोकलमुळे अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे खासदार सावंत यांनी सांगितले.
Friday, July 10, 2020
विरार-डहाणू मार्गाचेही चौपदरीकरण, पनवेल-कर्जत, ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्गाच्या कामास गती येणार
एमयुटीपी-३ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
विरार-डहाणू मार्गाचेही चौपदरीकरण
मुंबई, दि ९ : एमयुटीपी-३ मधील प्रकल्पांना चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन, राज्य शासन, एमएमआरडीए व सिडको यांच्या दरम्यान वर्षा येथे यासंदर्भातील सामंजस्य करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली.
याप्रसंगी नगर विकास मंत्री मंत्री एकनाथ शिंदे, अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास प्रवीण परदेशी, एमएमएमआरडीए आयुक्त आर राजीव, एमआरव्हीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर एस खुराणा, अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ.सोनिया सेठी, एमआरव्हीसीचे वित्त संचालक अजित शर्मा यांची उपस्थिती होती.
या करारामुळे खालील प्रकल्पांना वेग येईल.
पनवेल-कर्जत दरम्यान २८ किमी नवीन उपनगरीय रेल्वे मार्गिका टाकणे – २७८३ कोटी
ऐरोली-कळवा दरम्यान ३.५ किमी उन्नत रेल्वे मार्ग बांधणे – ४७६ कोटी
विरार-डहाणू दरम्यान ६३ किमी रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करणे (तिसरी-चौथी रेल्वे मार्गिका टाकणे) – ३५७८ कोटी
नवीन रेल्वे गाड्या खरेदी करणे (४७ रेक्स) – ३४९१ कोटी
मध्य व पश्चिम रेल्वे मार्गाच्या मध्य विभागात ट्रेस पास कंट्रोल – ५५१ कोटी
तसेच तांत्रिक सहाय्य – ६९ कोटी
मुंबई व उपनगर रेल्वे सेवेमध्ये अधिक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-३ (MUTP-III) या रु.१०,९४७ कोटी प्रकल्प पुर्णत्व किमंतीच्या प्रकल्पास रेल्वे मंत्रालयाने प्रकल्पास मंजूरी दिली होती.
राज्य शासनाने भारतीय रेल्वेच्या सहभागाने मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-१ व टप्पा- २ च्या धर्तीवर ५०:५० आर्थिक सहभागातून हा प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आली आहे.