Showing posts with label Employment news. Show all posts
Showing posts with label Employment news. Show all posts

Friday, March 3, 2023

महाडीबीटीवर मोफत सोलर पंप योजना

नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आणलेली आहे म्हणजेच महाडीबीटीवर अनुसूचित जमातीचे शेतकरी साठी मोफत सोलर पंप योजना करिता आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत ही योजना सोलर पंप योजना अनुसूचित जमातीसाठी शंभर टक्के अनुदान आहे.
अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासीचे शेतकरी यांनी महाडीबीटी या साइटवर जाऊन आपले रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला अनुसूचित जमाती चे विशेष शेतकरी योजना चे आपल्याला सोलर पंप याचे निवड करून रजिस्ट्रेशन करायचे आहे त्यानंतर त्या नोंदणीचे 23 रुपये किंवा 25 रुपये जी रक्कम आहे ती रक्कम भरावी ची ऑनलाईन किंवा नेट बँकिंग किंवा क्यू आर स्कॅन याच्या मार्फत पैसे भरायचे आहेत तसेच ते झाल्यावर महाडीबीटीवर लॉटरी लागल्यानंतर आपली या योजनेची निवड करण्यात येईल.
सोलर पंप योजनेसाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत

1.सातबारा उतारा
2.आठ A उतारा 
3.जातीचा दाखला 
4.उत्पन्नाचा दाखला
5. आधार कार्ड
6. मोबाईल न

Friday, October 14, 2022

विहीर खोदकामासह मनरेगाच्या कामाच्या अनुदानात वाढ


Mgnrega wage वाढल्याने कृषीसहित (Agriculture) इतर सर्व विभागांमार्फत होणाऱ्या अकुशल कामांना सुधारित दरपत्रकाचा होणार फायदा जाऊन घेऊयात काय आहेत नवे दर सविस्तर पणे ( know about What is the current wage of MGNREGA 2022 )

केंद्र शासनाच्या माध्यमातून २८ मार्च २०२२ रोजी एक अधिसूचना काढून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे मजुरी दर ( Mgnrega wage ) निश्चित केले आहेत. २८ मार्च २०२२ या अधिसूचनेनुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील मजुरांना द्यावयाचा अकुल मजुरीचा दर हा महाराष्ट्रासाठी २५६ रुपये इतका निश्चित करण्यात आलेला आहे.


सुधारित दर महाराष्ट्रासाठी दिनांक ०१ एप्रिल २०२२ पासून लागू करण्यात आलेला आहे. आणि यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी  योजना आयुक्त यांनी एक पत्रक काढून सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना सूचित केले आहे.

या प्रतिदिन २५६ रुपये केलेल्या नव्या मजुरी दरामुळे मनरेगा तुन राबविल्या जाणाऱ्या कृषीसहित (Agriculture dept ) इतर सर्व विभागांमार्फत होणाऱ्या अकुशल कामांना या सुधारित दरपत्रकाचा मोठा फायदा होणार आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आयुक्तालयाने दिलेल्या रोहयो च्या वाढीव मजुरीच्या या पत्रकामुळे जमिनीच्या विविध प्रकारांनुसार खोदाईचे प्रती घण मीटर दरदेखील आता वाढविण्यात आलेले आहेत. जे आता खोदकामाच्या प्रकारानुसार १२५ रुपयांपासून ते ४९० रुपयां घनमीटर पर्यंत असणार आहेत. याचबरोबर जनजाती / डोंगराळ क्षेत्रासाठी दिले जाणारे खोदाई मजुरीचे दर सुध्दा जास्त दिले जातात.

नवीन विहीर खोदकाम योजनेच्या खोदाईचे प्रतिघनमीटर दर देखील आता १५६ रुपयांपासून ते ६१३ रुपयांपर्यंत करण्यात आलेले आहेत.

अकुशल मजुरी व त्यानुषंगाने वाढलेल्या या खोदाईच्या दरामुळे विहीर खोदाई, चरांचे खोदकाम, फळबाग लागवडी सारख्या कामामध्ये जॉब कार्डधारक शेतकऱ्यांच्या पदरात एक चांगली रक्कम पडणार आहे.

मनरेगा नवीन मजुरी दर  pdf