Showing posts with label UIDAI. Show all posts
Showing posts with label UIDAI. Show all posts

Sunday, June 30, 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
 सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सुचित करण्यात येते की आज महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना "घोषित केलेली आहे यामध्ये रुपये १५००/ महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही योजना याच महिन्यात चालू होणार आहे सदर योजना महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राबवल्या जाणार आहे याच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे आहे.
१) 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित ,परितकत्या,विधवा ,महिला 
२) त्या महाराष्ट्रातील रहिवासी असल्याबाबतचे अधिवास सर्टिफिकेट
३) उत्पन्नाचे रू२.५० लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत असावे 
४)बँकेमध्ये सदर महिलेचे नावे खाते असावी 
५)रेशन कार्ड मध्ये सदर महिलेचे नाव अंतर्भूत असावी .

सदर योजना अंतर्गत सोमवारी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना "नारी शक्ती दुत ॲप "प्ले स्टोअर वरून आपल्याला देण्यात आलेल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यावयाचा आहे.

महत्वाचे __सर्वात पहिले अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आपली नोंदणी या योजनेअंतर्गत पुढील आठवड्यात सोमवार ते बुधवार पर्यंत १००%करून घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नोंदणी सदर "नारी शक्ती दुत ॲप" मध्ये करून घेण्याची जबाबदारी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे नोंदणी करत असताना 
1)उत्पन्नाचा दाखला सण 2025 पर्यंत वैद्य असणारा असावा
२) जन्माचा दाखला असावा /टि.सी झेरॉक्स असावी /डोमेसाईल प्रमाणात 
३)रेशन कार्ड ची झेरॉक्स असावी
४) आधार 
५) लाभार्थी नावाने बंक पासबुक झेरॉक्स

 सर्व माहिती ॲप मध्ये अंगणवाडी सेविका यांना भरावयाची आहे सोबत आधार कार्ड असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविकेला गावातील आशा वर्कर, सर्व बचत गटाच्या महिला यांना सुद्धा या योजनेबाबत योजनेबाबत माहिती देऊन "नारी शक्ती दुत"ॲप त्यांना प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून या योजने करता अर्ज करायला सांगावे.
तसेच गावातील इतर पात्र असणाऱ्या 21 ते 60 वयोगटातील महिलांना सुद्धा आवश्यक कागदपत्र तयार करून गावातील सेतू केंद्रातून किंवा ग्रामसेवकांच्या माध्यमातून सदर योजने करता अर्ज किंवा माहिती भरणे बाबत जनजागृती अंगणवाडी केंद्रामध्ये माता सभा घेऊन उद्या पासून करावी तसेच१ ते 15 जुलै२४ या कालावधी गावातील कोणतीही 21 ते 60 वयोगटातील पात्र असणारी महिला "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत" वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी घ्यावी गावातील जेवढे ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपमध्ये या योजनेबाबत माहिती टाकावी काही आवश्यकता असल्यास त्यांना बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित बीटच्या पर्यवेक्षिका यांचा मोबाईल नंबर देण्यात यावा धन्यवाद.

Tuesday, June 18, 2024

Aadhar Online Update :आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची संधी; वाचा संपूर्ण माहिती

Aadhar Online Update : आधार कार्ड हा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे. अंत्यत महत्वपूर्ण



ओळखीचा पुरावा आहे. आधार कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. आधार अपडेट करण्यासाठी UIDAI ची मोफत सेवा १४ जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड ऑनलाइन मोफत अपडेट करण्यासाठी आता फक्त १० दिवसांचा अवधी शिल्लक आहे.


आधार कार्डधारकांनी दर १० वर्षांनी (आधार नोंदणीच्या तारखेपासून) आपले ओळख पुरावा (POI) आणि निवास पुरावा (POA) अपडेट करणे आवश्यक असते. ५ आणि १५ वर्षांच्या वयात मुलाच्या ब्लू आधार कार्डवर बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्यासाठीही हा नियम लागू होतो. महत्वाचे म्हणजे, तुम्ही नाव, पत्ता, जन्मदिनांक / वय, लिंग, मोबाईल नंबर, ईमेल पत्ता, वैवाहिक स्थिती आणि माहिती सामायिकरण संमती यासारखी माहिती ऑनलाइन मोफत अपडेट करू शकता.


आधार अपडेट करणे का आवश्यक आहे?

• आधार हा भारतीय रहिवाशांना जारी केलेला १२-अंकी युनिक ओळख क्रमांक आहे.

• सरकारी सेवा आणि आर्थिक व्यवहार सुरक्षितपणे करण्यासाठी आधार आवश्यक आहे.

• आधार अपडेट ठेवून duplication टाळण्यास आणि फसव्या कारवाया ओळखण्यास मदत होते.


ऑनलाइन आधार अपडेट कसे करावे?

1. आधार वेबसाइटवर जा (uidai.gov.in) आणि तुमची आवडती भाषा निवडा.

2. "My Aadhar" टॅबवर क्लिक करा आणि "Update My Aadhar" निवडा.

3. "डॉक्युमेंट अपडेट" वर क्लिक करा.

4. तुमचा UID क्रमांक आणि Captcha कोड एंटर करा आणि "OTP पाठवा" वर क्लिक करा.

5. OTP मिळाल्यानंतर ते एंटर करा आणि "लॉग इन" वर क्लिक करा.

6. अपडेट करायची माहिती (नाव, पत्ता, जन्मदिनांक इ.) निवडा आणि नवीन माहिती अचूकपणे भरा.

7. आवश्यक बदल केल्यानंतर, "सबमिट" वर क्लिक करा आणि तुमच्या अपडेट विनंतीला समर्थन देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.

8. "अपडेट विनंती सबमिट करा" वर क्लिक करा. तुमच्या विनंतीची स्थिती ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला SMS द्वारे अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) मिळेल.


आधार अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

ओळख पुरावाः पासपोर्ट, ड्रायविंग लायसन्स, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, सरकार जारी केलेले ओळखपत्र, मार्कशीट, लग्नपत्र, राशन कार्ड.

निवास पुरावाः बँक स्टेटमेंट (३ महिन्यांपेक्षा जुने नाही), वीज किंवा गॅस कनेक्शन बिले (३ महिन्यांपेक्षा जुने नाही), पासपोर्ट, लग्नपत्र, राशन कार्ड, मालमत्ता कर रसीद (एक वर्षापेक्षा जुनी नाही), सरकार जारी केलेले ओळखपत्र. 


लक्षात ठेवा, तुम्ही तुमची बायोमेट्रिक माहिती ऑनलाइन मोफत अपडेट करू शकत नाही.

तुम्ही तुमचे ओळख आणि निवास पुरावे १४ जून २०२४ पर्यंत मोफत ऑनलाइन अपडेट करू शकता, त्यानंतर शुल्क लागू होईल. ऑनलाइन अपडेटसाठी २५ रुपये आणि ऑफलाइन अपडेटसाठी ५० रुपये शुल्क आकारले जाईल. तसेच आधार अपडेट न झाल्यास बँक अकाउंट वरून व्यवहार करण्यासाठी देखील अडचणी येऊ शकतात.