Sunday, July 31, 2022
10 वी आणि 12वी साठी 17 नंबर फॉर्म ऑनलाईन फॉर्म [Online Form]
Saturday, July 30, 2022
Palghar Job Fair 2022 | 10 वी ते पदवीधर उमेदवारांकरिता पालघर येथे 164+ पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
- पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी/ प्रशिक्षणार्थी, ITI प्रशिक्षणार्थी, स्टोअर/ गुणवत्ता नियंत्रण/ उत्पादन/ खरेदी/ घरबांधणी/ खाती आणि संचालन/ प्रयोगशाळा/ मशीन ऑपरेटर
- पद संख्या – 164+ जागा
- शैक्षणिक पात्रता – SSC/ Graduation(Refer Advertisement)
- पात्रता – खाजगी नियोक्ता
- अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
- राज्य – महाराष्ट्र
- विभाग – मुंबई
- जिल्हा – पालघर
- नोकरी ठिकाण – पालघर
- निवड प्रक्रिया – रोजगार मेळावा
- मेळाव्याचा पत्ता – शासकीय माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रमशाळा, पाली ता.वाडा जि.पालघर येथे
- रोजगार मेळाव्याची तारीख – 29 ते 31 जुलै 2022 आहे
- Contact for Career Guidance as the following:
Monday, July 25, 2022
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तर्फे पदवी, पदविका आणि उच्च पदवी चा प्रवेश प्रक्रिया
Friday, July 15, 2022
Monday, July 11, 2022
Sunday, July 3, 2022
राज्यात पंतप्रधान पीकविमा योजनेचा (PMFBY)लाभ घ्यायचा असेल तर आजपासून
पीक विमा योजनेत कोणत्या कारणांसाठी नुकसानभरपाई मिळते?
पीक विमा योजनेतंर्गत गारपीट, जमिन धसने,पाणी साचणे, ढगफुटी व नैसर्गिक आगीमुळे होणाऱ्या शेतीनिहाय नुकसानाचे मूल्यांकन करून नुकसान भरपाई दिले जाते. नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यावर केन्द्र सरकाराने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी फेब्रुवारी2016 मध्ये अत्यंत महत्वकांक्षी 'पंतप्रधान पीक विमा योजना ' सुरू केली.
पीक विमा योजनेमध्ये(PMFBY) कशी नुकसानभरपाई मिळते?
पेरणीच्या 10 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना पीएमएफबीवायचा अर्ज भरावा लागतो. नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचे पीक खराब झाले असेल, तरच विमा रकमेचा लाभ मिळतो. पेरणीपासून तर काढणी दरम्यान उभ्या पिकांचे जर नैसर्गिक आपत्ती, रोग आणि कीटकांच्या प्रादुर्भावमुळे नुकसान झाले असेल
तर या विम्याचा लाभ मिळतो. तसेच उभ्या पिकाचे जर स्थानिक आपत्ती,गारपीट,दरड कोसळणे, ढग फुटी, वीज पडल्यामुळे नुकसान झाले तर याचा लाभ मिळतो, तसेच पीक काढल्यानंतर पुढील 14 दिवसापर्यंत शेतात सुकवण्यास ठेवलेल्या पिकांवर जर अवेळी मौसमी चक्रीवादळ, गारा व वादळाचा प्रादुर्भाव झाला तर नुकसान भरपाई दिली जाते. तसेच प्रतिकूल हंगामी परिस्थितीमुळे पिकांची पेरणी झाली नसेल तर देखील या विम्यापासून लाभ मिळतो.
किती प्रिमीयम भरावा लागतो?
खरीप पिकांसाठी प्रत्येकी 2% प्रीमियम आणि रब्बी पिकांसाठी प्रत्येकी 1.5% प्रिमियम भरावा लागतो. पीएमएफबीवाय योजनेचा व्यावसायिक आणि बागाईत पिकांसाठी विमा संरक्षण देखील प्रदान करते. यात शेतकऱ्यांना 5% प्रीमियम भरावा लागतो.
लाभ मिळण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागतात?
शेतकऱ्यांना एक फोटो, ओळखपत्र, निवासाचा पत्ता म्हणून पुरावा, 7/12 उतारा, शेतातील पुरावा द्यावा लागतो. दाव्यासाठी शेतकऱ्यांचा पीक विमा कंपनीच्या टोल फ्री नंबर किंवा विमा कंपनी व कृषी विभागाच्या संपर्क साधू शकतात. यात 72 तासाचा कालावधी निश्चित केला आहे. नुकसान झाल्यास शेतीनिहाय नुकसानाचे मूल्यांकन करून पैसे दिले जातात.