Wednesday, September 2, 2020
मोदी सरकारचा मोठा निर्णय: आणखी 118 चिनी अँप वर बंदी
Monday, June 1, 2020
आता काळ स्वदेशीचा, व्हॉट्सऍपला नव्हे तर करा "भारत मॅसेंजर'चा वापर...
कोरोनाच्या संकटात सापडलेल्या जगाने बघता बघता चीनच्या वस्तूंना बॉयकॉट करणे प्रारंभ केले आहे. याचाच एक भाग म्हणून नागरिकांनी मोबाईलमधील चीन बनावटीचे ऍपदेखील अनइन्स्टॉल करणे प्रारंभ केले आहे. विशेष म्हणजे याचा सर्वाधिक फटका बसला असेल तर तो टिकटॉकला. अनेकांनी टिकटॉक ऍपला बाहेरचा रस्ता दाखविला आहे. आता व्हॉट्सऍप मॅसेंजरलाही पर्याय उपलब्ध झाला असल्याने भारतीयांनी भारत मॅसेंजरला पसंती दिलेली आहे.

दहा वर्षांपूर्वी अमेरिकेत उदयाला आलेल्या व्हॉट्सऍपने जगभरात धमाल उडवून दिली. फार अल्प काळात या ऍपने प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हक्काचे स्थान निर्माण केले. व्हॉट्सऍपने केवळ भारतीयांच्याच नव्हे तर जगातील लोकांच्या जीवनशैलीतही मोलाचे बदल घडविले. मात्र, आता काळ स्वदेशीचा आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या ग्रुपवर चर्चा रंगते आहे ती भारतीय बनावटीच्या भारत मॅसेंजरची.
सोनम वांगचूक यांनी नुकतेच भारतीयांना चिनी प्रॉडक्स बॉयकॉट करण्याचे आवाहन केले होते. प्रत्येक युद्ध सीमेवर लढता येते असे समजू नका, तर देशातील सामान्य व्यक्तीलाही ते लढायचे आहे असे वांगचूक म्हणाले होते. व्हॉट्सऍपचा जन्म दक्षिण अमेरिकेत झाला असला तरी व्हॉट्सऍपच्या धर्तीवर भारत मॅसेंजरचा चाहतावर्गदेखील झपाट्याने वाढतो आहे. एका समुदायाने तर एक जूनला सर्वांनी भारत मॅसेंजर डाउनलोड करून घ्या असेदेखील आवाहन केले आहे.
पाहुणा वाराणसीत जन्माला आला
महागड्या मोबाईलमधील व्हॉट्सऍपची जागा घेणारा भारत मॅसेंजर नावाचा हा नवीन पाहुणा वाराणसीत जन्माला आलेला आहे. यात सोळा ते पन्नास एमबीपर्यंतचा व्हिडिओ पाठविता येणार आहे. वर्ड, एक्सेल व अडॉबच्या फाइल पाठविता येणार असून, ऍप वापरण्याची पद्धत व्हॉट्सऍप सारखीच आहे.
प्ले-स्टोअरवर उपलब्ध
भारत मॅसेंजर प्ले-स्टोअरवर उपलब्ध असून, तो डाउनलोड करण्यासाठी अवघी 51 एमबीची जागा लागते. आत्तापर्यंत हे ऍप एक लाखाहून अधिक युझर्सने डाउनलोड केलेले असून, व्हॉट्सऍप ग्रुपवर हा स्वदेशी भारत मॅसेंजर प्रत्येकाने डाउनलोड करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Wednesday, May 27, 2020
भारतीय ‘मित्रों’ची टीक-टॉकला तगडी टक्कर; लाखोंच्या संख्येत झाले डाऊनलोड
शॉर्ट व्हिडीओ अॅप टीक-टॉकचे रेटिंग काही दिवसांपुर्वी युजर्सने खराब रिव्ह्यू देऊन कमी केले होते. या अॅपवर बंदी घालण्याची देखील युजर्सने केली होती. याच पार्श्वभुमीवर आता मित्रों (Mitron) नावाचे एक भारतीय अॅप टिकटॉकला टक्कर देत आहे. आतापर्यंत 50 लाखांपेक्षा अधिक वेळा हे अॅप डाऊनलोड करण्यात आले आहे. टीक-टॉक सारखेच फीचर्स मिळणाऱ्या या अॅपला आयआयटी रुडकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे.
आयआयटी रुडकीचा विद्यार्थी शिवांक अग्रवालने तयार केले असून, हे अॅप गुगल प्ले स्टोरवर टॉप फ्री चार्टच्या टॉप-10 समावेश झाले आहे. पेटीएमचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक यांच्याद्वारे करण्यात आलेल्या ट्विटमध्ये हे अॅप दुसऱ्या स्थानावर दिसत आहे. या अॅपमध्ये टीक-टॉक व्यतिरिक्त दुसरे कोणतेही खास फीचर्स नाहीत. मात्र आपल्या नाव आणि ब्रँडिंगमुळे लोकप्रिय होत आहे.

Image Credited – Forbes
अॅप नवीन असून, यात अनेक बग्स आहेत. असे असले तरी याला चांगले रिव्ह्यू मिळत आहेत. जवळपास 4.7 रेटिंग्स असणाऱ्या या अॅपमध्ये लॉग इन करताना समस्या येत असल्याचे अनेक युजर्सनी म्हटले आहे. मात्र भारतीय अॅप असल्याने भरपूर सपोर्ट मिळत आहे. 8 एमबीच्या या अॅपला 11 एप्रिल 2020 ला रिलीज करण्यात आले होते. सध्या केवळ गुगल प्लेवरच हे अॅप उपलब्ध आहे.
