Wednesday, April 23, 2025

वैयक्तीक शौचालय अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरु |स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण-2) 2025

केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत वैयक्तीक शौचालय अनुदान online अर्ज सुरू
स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) ही केंद्र पुरस्कृत महत्त्वाकांक्षी योजना, केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेसंदर्भात जनजागृती निर्माण करणे, स्वच्छतेची व्याप्ती वाढविणे व उघड्यावर मलविसर्जन करण्यास प्रतिबंध करण्यासाठी लाभार्थी कुटुंबाने वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर अनुषंगिक प्रोत्साहन अनुदान देण्यात येते.

स्वच्छ भारत अभियान (ग्रा.) ( Swachh bharat mission 2 )अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तीक शौचालय अनुदान करिता ऑनलाइन अर्ज सुरु झाले आहेत.

यासाठी SBM च्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्याची सुविधा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सुरू केली आहे.

या प्रणालीद्वारे ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता व त्यानंतर प्रोत्साहन अनुदान मान्यतेसाठी अर्ज करता येणार आहेत.

ऑनलाइन प्रणालीद्वारे वैयक्तिक शौचालयाकरिता अर्ज करण्याची सुविधा, खालील लिंक वर उपलब्ध आहे.

https://sbm.gov.in/sbm_dbt/secure/login.aspx

वैयक्तिक शौचालय अनुदान (shauchalay yojana 2025 ) साठी online अर्ज कसा करावा खालील लिंक वर पहा.

https://sbm.gov.in/sbmphase२/homenew.aspx या लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.या लिंकवर अर्जदाराला सर्वात प्रथम नोंदणी ( beneficiary registration for free toilet scheme ) करायचे आहे.

नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जदारास मिळालेल्या वापरकर्ता आयडी व पासवर्ड सह ऑनलाईन पद्धतीने वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता व त्यानंतर वितरणासाठी प्रोत्साहन अनुदानाकरिता मान्यतेसाठी अर्ज करता येणार आहे.
लाभार्थी निवड:-

या योजनेअंतर्गत, दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंबे व दारिद्र्यरेषेवरील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, लहान व अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि महिला कुटुंब प्रमुख हे सर्व घटक या योजनेच्या प्रोत्साहन अनुदानास पात्र करण्यात आले आहेत.

यापूर्वी पायाभूत सर्वेक्षणात आढळलेल्या व वैयक्तिक शौचालय नसलेल्या, पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या तसेच पायाभूत सर्वेक्षणाबाहेरील अशा ६६ लाख ४२ हजार ८९० कुटुंबांना वैयक्तिक शौचालय सुविधा, स्वच्छ भारत अभियान (ग्रा.)च्या पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Monday, April 14, 2025

पंतप्रधान आवास योजनेचे (शहरी आणि ग्रामीण) फोर्म भरून भेटतील.

पंतप्रधान आवास योजनेचे (शहरी आणि ग्रामीण) फोर्म भरून भेटतील.
संपर्क- संदेश इंटरप्रिंसेस तलासरी
मु. तलासरी पाटिलपाडा नाका-सूत्रकार रोड, ता. तलासरी Mob. No. 9373241796

 पंतप्रधान आवास योजनेसाठी लागणारी कागदपत्रे:-

१. आधार कार्ड 

२. कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड 

३. बँक पासबुक  (बँकेचे  खाते आधारला जोडलेलं असावे )

४. ऊत्पन्नाचा दाखला

५. जातीचा दाखला (एससी, एसटी आणि ओबीसी)

६. ७/१२ व 8अ उतारा 

 ७. घरपट्टी, रेशन कार्ड, पॅन कार्ड

Thursday, April 10, 2025

अग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मिळणार शेतकरी ओळख क्रमांक

शेतकरी बांधवांना जाहिर अवाहन

अॅग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मिळणार शेतकरी ओळख क्रमांक

अॅग्रीस्टैंक काय आहे?

• शेतकऱ्यांना अधिक समृद्ध आणि सशक्त बनविण्यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी माहिती संच हंगामी पीक माहिती संच व भू संदर्भीय भूभाग माहिती संच निर्मिती म्हणजेच अॅग्रीस्टैंक या क्रांतिकारी संकल्पनेची महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू झाली आहे.

• कृषी क्षेत्रासाठी सर्वसामावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे.

• या संकल्पनेद्वारे शेतकरी ग्राहक विक्रेते आणि सरकार यांना एकत्र आणते व यामधून शेतीच्या प्रक्रियेतील माहिती अचूक व पारदर्शकपणे मिळते.

• याद्वारे शेतकऱ्याची व त्याच्या शेत जमिनीची ओळख पटविणार व शेतकऱ्यास अद्वितीय शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) मिळणार आहे.

• अॅग्रीस्टैंक उपक्रम हा आपल्या शेतीचे भविष्य बदलणारी एक नवीन प्रणाली असून शेतकरी ओळख क्रमांक ही एक जादुई डिजिटल चावी आहे

ज्या चावी द्वारे शेतकऱ्याास अनेक संधीचे दरवाजे उघडते.

अॅग्रीस्टॅक योजनेचे शेतकऱ्यांसाठी अपेक्षित फायदे

• शेतकऱ्याची व त्याच्या शेत जमिनीची ओळख पटविणार व शेतक-यास अव्दितीय शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) मिळणार

• शेतकऱ्यांना सर्व कृषी योजनांचा लाभ मिळण्यामध्ये सुलभता

• PM-Kisan योजनेतील आवश्यक अटी पूर्ण करून शेतक-यास लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता

• PM-Kisan योजनेंतर्गत पात्र सर्व लाभार्थीचा समावेश


पिक कर्जासाठी किसान क्रेडीट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व इतर कृषी कर्ज उपलब्धतेसाठी सुलभता

पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नुकसान भरपाईसाठी शेतक-यांचे सर्वेक्षणामध्ये सुलभता. •

• किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये शेतक-यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पध्दतीने होऊ शकेल.

• शेतकऱ्यांना सेवा देणा-या यंत्रणांना सदर सेवेसाठी सुलभता.

• शेतकऱ्यांना वेळेवर कृषि विषयक सल्ले उपलब्ध होणे, विविध संस्थांना शेतक-यांना संपर्क करणेच्या संधीमध्ये वाढ

शेतकरी ओळख क्रमांकासाठी काय आवश्यक आहे ?

• शेतक-याचा आधार नंबर

• आधार संलग्न मोबाईल नंबर

• शेतजमिनिचे खाते नंबर

शेतकरी ओळख क्रमांकासाठी कोणाकडे संपर्क कराचा ?

• संबंधित गावातील ग्राम महसूल अधिकारी / कृषि सहायक / ग्राम विकास अधिकारी

• नागरी सुविधा केंद्र (CSC)

केवळ दोनच मिनिटात मिळवा शेतकरी ओळख क्रमांक

जर का अजूनही फार्मर आयडी आपण निर्माण केला नसेल तर आजच आपले आधारकार्ड व आधार क्रमांकाशी जोडलेला मोबाईल क्रमांक तसेच शेतजमिनिचे खाते नंबर घेऊन नजिकच्या नागरी सुविधा केंद्राशी संपर्क करा व आपला शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करून घ्या.

शेतकरी बांधवांनो हे लक्षात घ्या

ज्या शेतक-यांनी आपला शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घेतला नाही तर भविष्यात कृषि विषयक कोणत्याही अनुदानाच्या

योजनांचा लाभ मिळणार नाही.