Saturday, January 28, 2023
Sunday, November 6, 2022
मोफत डिश टीव्ही आता नव्या चॅनेल
New Channel line-up on DD FreeDish, effective from April 1, 2022
DD Free Dish DTH service is owned and operated by Public Service Broadcaster Prasar Bharati. It was launched in December, 2004. DD Free Dish is the only Free-to-Air (FTA) Direct-To-Home (DTH) Service where there is no monthly subscription fee from the viewers. It is very affordable for all as it requires only a small one time investment of about Rs. 2000/- for purchasing of Set-to-Box (STB) and small sized Dish Antenna with accessories. The unique free to air model has made DD Free Dish the largest DTH platform.
दूरचित्रवाणी सेवा वितरण उद्योगात लक्षणीय वाढ नोंदवत, 43 दशलक्षहून अधिक घरांपर्यंत पोहोचलेला दूरदर्शन फ्रीडिश ( DD Free Dish ) हा सर्वात मोठा डीटीएच मंच बनला आहे. सुधारित लिलाव प्रक्रियांमुळे अधिक गुणवत्ता आणि विविध प्रकारच्या वाहिन्यांचे प्रमाण वाढवत 2017 आणि 2022 दरम्यान दूरदर्शनच्या विनामूल्य डीटीएच सेवेने 2017 मधील 22 दशलक्ष वरून 2022 मध्ये 43 दशलक्ष घरांपर्यंत पर्यंत विस्तारत सुमारे 100% ची चांगली वाढ नोंदवली.
डीडी फ्रीडिश ( DD Free Dish ) सेवेने मोठ्या संख्येच्या वाढीचा मार्ग का आणि कशाप्रकारे सुरु ठेवला आहे याला अलीकडेच प्रकाशित झालेल्या फिक्की-ईवाय अहवाल 2022 ने पुष्टी दिली आहे की, ''कमी खर्चिक दूरचित्रवाणी संच, आर्थिक पैलू आणि या मंचावर नवीन वाहिन्यांची भर पडल्यामुळे या विनामूल्य दूरचित्रवाणी सेवेने आपला आधार वाढवत 43 दशलक्ष सदस्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. डीडी फ्रीडिश सेट-टॉप बॉक्सच्या विक्रीत वर्षानुवर्षे वाढ होत असल्याचे नमूद करत या अहवालात फ्रीडिश वितरकांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
2004 ते 2017 या 13 वर्षांतील 22 दशलक्ष सदस्यांच्या तुलनेत, डीडी फ्रीडिशची गेल्या 5 वर्षांतील वाढ लक्षणीय आहे.2017 ते 2022 या केवळ 5 वर्षांमध्ये, फ्री डिशने आणखी 21 दशलक्ष सदस्य जोडले असून आता ही सेवा एकूण 43 दशलक्ष सदस्यांपर्यंत पोहोचली आहे.
प्रसार भारतीची डीटीएच सेवा असलेली डीडी फ्री डिश ही एकमेव फ्री-टू-एअर (एफटीए ) डायरेक्ट-टू-होम (डीटीएच ) सेवा आहे जिथे प्रेक्षकांना कोणतेही मासिक सदस्यत्व शुल्क भरावे लागत नाही.डीडी फ्रीडिश सेट-टॉप बॉक्स खरेदीसाठी केवळ एकदाच 2000 रुपयांची छोटी गुंतवणूक आवश्यक आहे.
डीडी फ्रीडिश सेवेच्या यशोगाथेचे आणखी उदाहरण असे आहे की, 2022-23 साठी डीडी फ्रीडिशच्या एमपीइजी -2 स्लॉट्सच्या वाटपासाठीच्या नव्या ई-लिलावामध्ये, 63 वाहिन्यांना विविध प्रकारांमध्ये यशस्वीरित्या स्लॉट वाटप करण्यात आले.डीडी फ्रीडिशच्या सदस्यता आधारावरील वृद्धीसह , डीडी फ्रीडिशवरील वाहिन्यांची संख्यादेखील या वर्षी अनेक श्रेणींमध्ये वाढली आहे.बातम्या आणि चालू घडामोडींच्या श्रेणीमध्ये वाहिन्यांची संख्या 11 वरून 14 पर्यंत वाढली आहे, तर हिंदी संगीत, हिंदी क्रीडा वाहिनी , हिंदी टेलिशॉपिंग , भोजपुरी चित्रपट आणि भोजपुरी सामान्य मनोरंजन वाहिन्यांच्या संख्येत 13 वरून 16 पर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे.
डीडी फ्रीडिश सेवा एकूण 167 दूरचित्रवाणी वाहिन्या आणि 48 रेडिओ वाहिन्या उपलब्ध करून देते यात 91 दूरदर्शन वाहिन्या (51 को ब्रँडेड शैक्षणिक वाहिन्यांचा समावेश आहे) आणि 76 खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांचा समावेश आहे.1 एप्रिल 2022 पासून, डीडी फ्रीडिश खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या संचात 8 हिंदी सामान्य मनोरंजन वाहिन्या, 15 हिंदी चित्रपट वाहिन्या , 6 संगीत वाहिन्या, 22 वृत्त वाहिन्या, 9 भोजपुरी वाहिन्या, 4 भक्ती वाहिन्या आणि 2 परदेशी वाहिन्या असतील.
नवीन वाहिन्यांच्या समावेशामुळे डीडी फ्रीडिश संच पूर्वीपेक्षा अधिक वैविध्यपूर्ण आणि आकर्षक बनला आहे. डीडी फ्रीडिशवर प्रथमच खाद्यपदार्थांसाठी समर्पित वाहिनी , शेफ संजीव कपूर यांच्या ‘फूड फूड’ चा समावेश करण्यात आला आहे. क्रीडाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आता डीडी स्पोर्ट्स व्यतिरिक्त ‘माय कॅम ’ ही डीडी फ्रीडिशची आणखी एक क्रीडा वाहिनी असेल.
डीडी फ्रीडिशवर नवीन वाहिन्या , 1 एप्रिल 2022 पासून उपलब्ध
New Channel line-up on DD FreeDish, effective from April 1, 2022
Monday, July 6, 2020
भारताचं पहिलं सोशल मीडिया App Elyments झालं लाँच, WhatsAppला देणार टक्कर
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच 59 चिनी Appsवर बंदी घातली होती. त्यानंतर अशा प्रकारचे Apps भारतात तयार का होत नाहीत असा प्रश्न विचारला जात होता. ही चर्चा सुरू असतानाच गुरुपोर्णिमेच्या मुहूर्तावर देशाचं पहिलं सोशल मीडिया App Elyments लाँच करण्यात आलं. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (M. Venkaiah Naidu) यांनी हे App लाँच केलं. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने टाकलेलं हे पाऊस असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या 1 हजार तत्रज्ञांनी एकत्र येत हे App तयार केलं आहे. आठ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये (Indian languages) हे App असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारीच आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे App लाँच झालं आहे.
चॅटिंग, ऑडियो-व्हिडियो कॉल त्याचबरोबर ई-कामर्सची सुविधा यात असणार आहे. या स्वदेशी Appला गुगल प्ले स्टोअर (Google Play Stores) आणि Apple App Storesमधून डाऊनलोड करता येणार आहे.
लाँचिंगच्या आधी या Appच्या अनेक महिने चाचण्या घेण्यात आल्या होत्या. आत्तापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त जणांनी हे App डाउनलोड केलं आहे. यात वापरकर्त्यांचा डेटा देशातच सुरक्षित राहणार आहे.
यात खासगी चॅटिंग ऑडियो-व्हिडियो कॉन्फरन्स कॉल, Elyments पेची सुविधा, त्याचबरोबर भारतीय ब्रँड्ससाठी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म असणार आहे.
आत्मनिर्भर भारताचा नारा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेत त्यांनी देशातल्या तरुणाईला एक चॅलेंज दिलं असून जागतिक दर्जाचे Made In India App बनविण्याचं आवाहन केलं आहे. (Aatmanirbhar Bharat App Innovation Challenge ) सध्याचं युग डिजिटलचं असून एका क्लिकवर सगळी कामं आणि व्यवहार होत आहेत. कोरोनामुळे त्याचं महत्त्व आणखी वाढलं आहे. त्यामुळे विदेशी तंत्रज्ञानावर विसंबून न राहता स्वदेशाला उत्तेजन देण्यासाठी पंतप्रधानांनी हे चॅलेंज दिलं आहे.
या चॅलेंजमध्ये पहिला क्रमांक मिळविणाऱ्याला 20 लाख, दुसऱ्या क्रमांकासाठी 15 लाख आणि तिसऱ्या क्रमांकासाठी 10 लाखांचं बक्षीस असून इतर अनेक बक्षिसही देण्यात येणार आहे. 18 जुलैपर्यंत प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख आहे.
Tuesday, June 30, 2020
Wednesday, June 24, 2020
घरगुती वीजग्राहकांना जूनमधील वीज बिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची पत्रकार परिषदेत माहिती
मुंबई, दि. २३: लॉकडाऊनच्या कालावधीनंतर सध्या मीटर रिडींग घेऊन जून महिन्याचे वीजबिल देण्यात येत आहे. महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत उपलब्ध आहे व स्थानिक कार्यालयांकडून वीजबिलांचे सुलभ हप्ते पाडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. महावितरणच्या फोर्ट येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी डॉ. राऊत म्हणाले, महावितरणच्या ग्राहकांवर वीजबिलांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा भुर्दंड लादलेला नाही. जूनमध्ये देण्यात येत असलेली वीज बिले ही लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी वापरलेल्या युनिटप्रमाणेच आहे. या वीजबिलाची घरबसल्या पडताळणी करण्यासाठी महावितरणने विशेष लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतरही काही शंका असल्यास ग्राहक आवश्यकतेनुसार https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवरून वाढीव वीजबिलांची पडताळणी करू शकतात. तसेच महावितरणच्या कार्यालयातही जाऊन वीजबिलांची आकारणी समजून घेता येईल. तसेच ग्राहकांना मीटर रिडींग चुकल्याने किंवा अन्य कारणाने चुकीचे वीजबिल गेले असल्यास ते दुरुस्त करण्यात येईल, अशी ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिली.
डॉ. राऊत म्हणाले, लॉकडाऊनच्या कालावधीत वीज ग्राहकांकडील मीटर रिडींग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीज बिल देण्यात आले. मात्र या कालावधीत महावितरणच्या आवाहनानुसार स्वतःहून मीटर रिडींग पाठविणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिले देण्यात आली आहेत. आता जूनमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी मीटर रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मार्चनंतर प्रथमच थेट जूनमध्ये मीटर रिडींग घेण्यात येत आहे. त्यामुळे मार्चपासून ते जूनमध्ये रिडींग घेईपर्यंत एकूण वीजवापराचे एकत्रित व अचूक बिल ग्राहकांना देण्यात येत आहे. या बिलामध्ये ग्राहकांवर एका पैशाचाही भुर्दंड बसणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे वीजबिल असल्याने स्लॅब बेनिफिट देण्यात येत आहे. तसेच ग्राहकांनी एप्रिल व मेमध्ये सरासरी वीजबिलांची रक्कम भरली असल्यास त्या रकमेचे समायोजन करण्यात येत आहे, चुकीच्या बिलाची दुरुस्तीसाठी तत्परतेने कार्यवाही करण्यात यावी व ग्राहकांना चुकीच्या वीजबिलांचा कोणताही त्रास होऊ नये, अशा सूचना महावितरणला देण्यात आल्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत सांगितले.
यावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव (ऊर्जा) व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे आणि महावितरणचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



.jpg)




