Wednesday, May 20, 2020

वापी येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने तलासरी नगरपंचायत हद्दीतील दुकाने बंद

सर्व नागरिकांना कळविणेत येते की, तलासरी नगरपंचायत लगतचे क्षेत्रामध्ये वापी येथे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तरी कोरोना विषाणू संसर्ग रोखणे करीता  प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तलासरी नगरपंचायत हद्दीतील गुरुवार दि.21/5/2020ते रविवार दि 24/05/2020 या कालावधीत सर्व दुकाने बंद राहतील.केवळ मेडिकल दुकाने, दवाखाने,बी-बियाणे दुकाने उघडे राहतील. तसेच दूध दुकाने केवळ सकाळी 7:00  ते 10:00  व साय 5:00 ते 7:00 या कालावधीत उघडे राहतील.

तसेच या कालावधीत परराज्यातून जाणे-येणंस व्यापाऱ्यांना संपूर्ण बंदी असेल. तसेच पीक-अप, टेम्पो, रिक्षा यांना देखील नगर पंचायत हद्दीत बंदी राहील.

यांची सर्व नागरिकांनी नोंद घेऊन नगर पंचायतीस सहकार्य करावे ही नम्र विनंती.

No comments: