Wednesday, May 20, 2020
शासनाचा सुधारित आदेश- बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून आलेल्यांना सरसकट इन्स्टीट्यूशनल कॉरन्टाईनची आवश्यकता नाही!
बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून आलेल्या नागरिकांना सरसकट इन्स्टीट्यूशनल (संस्थात्मक) कॉरन्टाईन करण्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट करणारे सुधारित आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. 18 मे रोजी जिल्हाधिकारी यांनी, बाहेरून आलेल्या लोकांना इन्स्टीट्यूशनल कॉरन्टाईन करण्याचे आदेश काढले होते. बाहेरून आलेल्या लोकांसाठी नगरपालिका व ग्रामपंचायतीना व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. शाळांमधून अशा लोकांची व्यवस्था करण्यात येणार होती. मात्र आज सुधारित आदेश काढण्यात आले असून, त्यानुसार ज्या लोकांकडे होम क्वारन्टाईन साठी घरात स्वतंत्र खोली असेल त्यांना होम क्वारन्टाईन करावे व ज्यांच्याकडे अशी व्यवस्था नसेल त्यांच्यासाठी इन्स्टीट्यूशनल कॉरन्टाईनची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment