गुजरात राज्यातील वापी येथील भाजीविक्रेता कोरोना पोझिटीव्ह निघाल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या तालासरीतील 10 भाजी विक्रेत्याचे स्वेब कोरोना तपासणीसाठी घेण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
येथील भाजीविक्रेते हे गुजरात राज्यातील वापी येथून भाजीपाला आणून त्याची विक्री तलासरीत करतात. अशा भाजीविक्री करणाऱ्या 40 जणांना वापी येथून भाजीपाला आणण्यासाठी कृषी विभागाकडून पास देण्यात आले आहेत. हे विक्रेते दररोज वापी येथून भाजीपाला आणत असत.
ही सगळी परिस्थिती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून तलासरी बाजारपेठ 21 ते 24 मे दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय तलासरी पंचायतीने घेतला आहे.
हे विक्रेते वापी येथील ज्या होलसेल बाजारातून भाजीपाला खरेदी करतात, त्या बाजारपेठेतील एक भाजी विक्रेता कोरोना पोसिटीव्ह निघाला. त्यामुळे त्यांचा संपर्कात आलेल्या व्यक्तीचा तपास सुरू असून त्यापैकी 10 जनाची कोरोना टेस्ट मंगळवारी करण्यात आली. उर्वरित लोकांचा तपास सुरू असल्याचे तहसीलदार स्वाती घोंगडे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment