पालघर जिल्ह्यात कृषी विभागाने खरीप हंगामात 1.10 लाख हेक्टर पेरणीच्या क्षेत्राचे नियोजन केले असून त्यसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांची व बियाण्याचे आवंटन शासनाकडून मंजूर करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
खरीप हंगामात प्रामुख्याने भात या पिकाची लागवड केली जाते, या व्यतिरिक्त काही प्रमाणात नागली व इतर कडधान्य घेतली जातात. जिल्ह्यात भाताचे 22000 क्वी. बियाण्याची मागणी करण्यात आली असून आजरोजी बाजारात विविध कंपनीचे 24000 क्वी. (110%) बियाणे उलब्ध आहे. तसेच रासायनिक खतांची जून अखेरसाठी 8700 मेट्रिक टनाची मागणी नोंदविली असून आजरोजी बाजारात 8500 मेट्रिक टन (97%) रासायनिक खताची उपलब्धता आहे. त्यामुळे बाजारात कुठल्याही प्रकारच्या खतांची व बियाण्याची टंचाई नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
शेतीशाळा :
जिल्ह्यात मागील आठवड्यात पावसाची सुरवात झाली असून शेतकरी पूर्व मशागत व भात रोपवाटीकेच्या कामास सुरवात करत आहेत. खरीप हंगामात भात हे प्रमुख पिक असल्याने हंगामात शेतकऱ्यांना भातपिकाविषयी तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्यक कृषी सहाय्यकांच्या समवेत शेतकाऱ्यांची शेतीशाळा आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये बीज प्रक्रिया, रोपवाटिका व्यस्थापन, खत व्यस्थापन, कीड व्यस्थापन आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
बांधावर तूर लागवड :
आदिवासी कुटुंबाच्या दैनंदिन आहारात समतोल अन्नघटकांचा समावेश व्हावा यासाठी आदिवासी विभाग आणि कृषी विभागाच्या सहकार्याने या खरीप हंगामात जिल्ह्यातील सर्व 67000 आदिवासी शेतकऱ्यांना 250 ग्राम तुरीचे बियाणे मोफत वाटप करण्यात येत आहे. एक एकर क्षेत्रासाठी पुरेल इतके बियाणे वाटप करून त्याची लागवड शेतकरी आपापल्या भाताच्या शेताच्या बांधावर करणार आहे. तुरीच्या लागवडीची पद्धत व त्याचे व्यस्थापन याचे मार्गदर्शन स्थानिक कृषी सहय्यक करणार आहे. यासाठी सर्व आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या गावचे कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
पिक विमा योजना :
पालघर जिल्ह्याचे प्रमुख फळपिक चिकू आहे. हवामानातील होणाऱ्या बदलामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने हवामान आधारित फळपिक विमा योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 30 जून 2020 आहे याची नोंद सर्व शेतकऱ्यांनी घ्यावी.
जव्हार व मोखाडा तालुका वगळता इतर सर्व तालुक्यासाठी हि योजना लागू करण्यात आली आहे. योजनेत एक मोठा बदल करण्यात आला असून त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना आपल्या बागेचा फोटो व अक्षांस/रेखांश अर्जासोबत द्यावे लागणार आहे. तरी ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईलची सोय नसेल त्यांनी आपल्या गावचे कृषी सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
No comments:
Post a Comment