शासन आपल्या दारी उपक्रमाचा उद्देश सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा आहे. बर्याचदा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेकदा नागरिकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
पालघर येथे 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी पालघर सिडको मैदानात सभामंडप उभारण्यात आला आहे. सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या ‘शासन आपल्या दारी' कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून हा कार्यक्रम १५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत राबवला जाणार आहे. या अभियानांतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागरिकांना शासकीय योजनांशी निगडित कार्यालयाचे प्रतिनिधी विविध दस्तावेज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
‘शासन आपल्या दारी' हा उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांपैकी एक आहे. लाभार्थीना या उपक्रमाचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जे लाभार्थी या उपक्रमापासून वंचित होते, अशा लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विश्वास फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. पालघर तालुक्यातील सुमारे २० गावांतील पाच हजार लाभार्थीसाठी गावागावात शिबिरे आयोजित करून त्यांना या योजनेत सामावून घेण्यासाठी निःशुल्क मदत विश्वास फाऊंडेशनतर्फे करण्यात आली आहे. शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून शेतकरी, मच्छीमार, बेरोजगारांना रोजगारासाठी मार्गदर्शन करणे, महिला, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य जनता यांच्यासाठी शासनाच्या आवश्यक व पूरक योजना देण्यात येत आहे.
योजना काय काय असतील
कृषी सेवा केंद्राचे परवाने
सेवानिवृत्त लाभ
आधार कार्ड
पॅन कार्ड
पासपोर्ट
ई-श्रम कार्ड
भरती मेळावा
पीएम किसान
विवाह नोंदणी
पीएफ घरकुल योजना
मनरेगा
जॉब कार्ड
मुलींना सायकल वाटप
नवीन मतदार नोंदणी
शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ
कृषी प्रदर्शन
डिजिटल इंडिया
सखी किट वाटप
दिव्यांग साहित्य वाटप
शिकाऊ चालक परवाना
या अभियानाचा लाभ अधिकाधिक लोकांना व्हावा म्हणून आपण आता माहिती तंत्रज्ञानाची मदत घेतो आहोत. महालाभार्थी या पोर्टलवर नोंदणी करून आपण योजनांचा लाभ घेऊ शकता. जिल्ह्यातील एमएससी आयटी केंद्रे, सीएससी केंद्रे तसेच कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून तेथील स्वयंसेवकांची मदत घेऊन आपण नोंदणी करू शकता आणि Shasan Aplya Dari योजनांचा लाभ घेऊ शकतात.
No comments:
Post a Comment