Wednesday, April 1, 2020

अत्यावश्यक खाजगी सेवा, आस्थापना आवश्यकतेनुसार सुरु राहणार-178 परदेशी प्रवाशी निरीक्षणासाठीअप्पर निवासी उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले

 
कोरोना विषांणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पालघर जिल्ह्यात विविध खाजगी आस्थापना, दुकाने, इत्यादी बाबींवर निर्बध घालण्यात आले आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी काही अत्यावश्यक खाजगी सेवा आस्थापना आवश्यकतेनुसार सुरु राहणार आहेत असे अप्पर निवासी उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी श्री. नवले बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. सागर पाटील उपस्थित होते.
सुरु राहणारे अत्यावश्यक, खाजगी सेवा, आस्थापना, शासकीय, निमाशाकीय सेवा पुढील प्रमाणे:
शासकीय, निमशासकीय कार्यालये,सरकारी महामंडळाचे उपक्रम, आस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रुग्णालये, पॅथोलॉजी, लॅबोरेटरी, दवाखाने,सर्व प्रकारचे वैद्यकीय (ॲलोपथी, आयुर्वेदिक, होमिओपथी इत्यादि.) नर्सिंग कॉलेज, रेल्वे स्टेशन, एस.टी.स्टँड, महानगर परीवहन थांबे व स्थानके, रिक्षा थांबे इत्यादि, अंत्यविधी, पिठाची गिरणी, अत्यावश्यक किराणा सामान, दुध/दुग्धोपादने, फळे व भाजीपाला, औषधालये, चिकन, मटण, मासे, स्विट मार्ट, बेकरी, इ. जीवनावश्यक वस्तू वितरीत विक्री करण्यास परवानगी राहील, उपहार गृह 5 ग्राहकांच्या क्षमतेपर्यंत तसेच पार्सल सुविधेसह (Take away) चालू राहतील, तसेचविद्यार्थ्यांसाठी खानावळ तसेच महाविद्यालये, वस्तीगृह यामधील कॅन्टींग, मेस (केवळ परीक्षार्थीसाठी) चालू राहतील, इयत्ता दहावी व इयत्ता बारावी तसेच राज्य शासन व केंद्र शासनाकडून घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा, विद्यापिठ, विश्व विद्यालयाच्या परीक्षा देणारे विद्यार्थी व संबंधित शैक्षणिक काम पाहणारी व्यक्ती, ज्या आस्थापना (उदा.माहिती व तंत्रज्ञान उद्योग) ज्यांच्याकडे देश व परदेशातील अतिमहत्त्वाच्या (Critical-National & International Infrastructure) उपकेंद्रांची जबाबदारी आहे व सदर आस्थापना बंद राहील्याने अशा उपक्रमांच्या प्रक्रियेला बाधा येऊ शकते असे सर्व संबंधित उपक्रम कार्यान्वित राहू शकतील (परंतू या दृष्टीने सदर आस्थापना कार्यरत ठेवण्याच्या आवश्यकते बाबत कामगार उपायुक्त, पालघर यांचेकडे विशेषरित्या कळविणे बंधनकारक आहे, प्रसारमाध्यमांचे (सर्व प्रकारचे दैनिक, नियतकालिके, टिव्ही न्युज चॅनेल इ.) कार्यालये चालू राहतील, पालघर जिल्हयातील सर्व बँकांचे एटीएम केंद्रे, वीज वितरण कंपन्यांचे बील भरणा केंद्रे, मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज स्टेशन, झेरॉक्स सेंटर हे सुरळीत चालू राहतील, असा विश्वास श्री. नवले यांनी व्यक्त केला.
सदर ठिकाणी हँड सॅनिटायझर (Hand Sacnitizers) ची योग्य ती व्यवस्था सर्व संबंधित आस्थापनांनी करावी.
उक्त आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील 51 (b) व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय/कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे अधिसूचनेत नमुद करण्यात आले आहे, असे अप्पर निवासी उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले यांनी सांगितले.
जिल्ह्यात सध्या 178 परदेशी प्रवासी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून दोन परदेशी प्रवासी यांच्या घशातील नमुने तपासणीसाठी कस्तुरबा गांधी रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. त्याचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. तसेच 14 दिवासाचा निरिक्षण कालावधी 33 प्रवासांनी पुर्ण केला या दरम्यान कोरोना संसर्ग झाल्याचे कोणतेही लक्षण त्यांचा मध्ये दिसले नसुन सध्या स्थितीत जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव रुग्ण नाही असे श्री. नवले यांनी सांगितले.
नागरिकांना आवाहन
जर आपल्याला हातावर ‘Home Quarentine Proud to Protect Palgharkar’ असा शिक्का असलेली व्यक्ती घराबाहेर फिरताना दिसली तर घाबरुन वा गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही. अशा व्यक्तींना नम्रपणे व आदरपूर्वक घरी राहण्याची विनंती करा.
त्यांना कोरोनाची बाधा झालेली नसून ते कोरोना बाधित देशातून प्रवास करुन आले असल्याने व कोरोनाची लक्षणे दिसायला 14 दिवस लागत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना पुढील 14 दिवस घरात विलगीकरण करुन राहावे लागणार आहे. असे विलगीकरण करणे नक्कीच सोपे नाही परंतु आपल्या सर्वांच्या आरोग्यरक्षाणाच्या दृष्टीने त्यांना स्वत:ला घरात बंदिस्त ठेवणार आहेत.इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेणे व घरीच राहणे ही गोष्ट नक्कीच अभिमानास्पद आहे. त्यामुळे अशा व्यक्तींकडे संशयित कोरोना रुग्ण या दृष्टीने न पाहता आपण त्यांना मदत व सहकार्य करणे अपेक्षित आहे. 

कामगारांना व भाडेकरूंना काढू नये.इतर राज्यातील स्थलांतरीतांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणार.-जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे पालघर जिल्ह्यातील इतर राज्यातील कामगारांना रोजगार उपलब्ध नसल्यामुळे तसेच जे बेघर झालेले कामगार आहेत. त्यांना मदत शिबिरात अन्न, पाणी, वैद्यकीय सुविधा या दैनंदिन गरजा पुर्ण करण्यात येणार आहेत. तसेच जे कामागार भाडेकरु आहेत अशा कामगारांना घरमालकाने या परिस्थितीत काढू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
कोरोना विषाणूाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशामध्ये 21 दिवासांचा ताळेबंद(lockdown) जाहिर करण्यात आला असून या कालावधीत जे कामगार कामावर उपस्थित राहू शकत नाही अशा पालघर जिल्ह्यातील कामगारांना कोणत्याही आस्थापनाने कामावरून काढू नये तसेच भाडेकरुंना घरमालकांने या परिस्थितीमध्ये घर सोडण्यास सांगू नये. तसेच इतर राज्यातून पालघर जिल्ह्यामध्ये रोजगारासाठी आलेले कमागार व कर्मचारी व इतर व्यवसाय करण्याऱ्या व्यक्तींची संख्या पालघर जिल्ह्यामध्ये 4013 असून या व्यक्तीनां रोजगाराचे साधन लॉकडाऊनमुळे उपलब्ध नसल्याने जिल्ह्यामध्ये अडकून पडले आहे. त्यांच्या दैनंदिन गरजा ते भागवू शकत नाही अशा व्यक्तींना जिल्हा प्रशासनाने मदत शिबिरामध्ये निवारा उपलब्ध करुन दिला असून त्यांना अन्न, पाणी वैद्यकीय मदत दिली जात आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कसा रोखावा याबाबत जनजागृती करण्यात येते. राज्यस्तरावर याबाबतीत काटेकोरपणे अंमलबजाणी व्हावी यासाठी राज्यस्तरीय सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष राज्याचे मुख्य सचिव आहेत. जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी साठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यातील व्यक्ती इतर राज्यात रोजगारानिमित्त वास्तव्यास असेल किंवा राज्यात इतरत्र असेल अशा कामगारांना संबंधित राज्यातील प्रशासनाने व सेवाभावी संस्थेने अडकून पडलेल्या किंवा रोजगार नसल्याने बेघर झालेल्या व्यक्तींना तसेच त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय मदत द्यावी, असे आवाहनहि जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी केले.
ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आढळून येतील यांच्यावर उपचार करण्यासाठी बोईसर येथील टिमा रुग्णालय हे अधिग्रहीत करण्यात आले असून या रुग्णालयात 40 खाटांचे अद्ययावत विलगीकरण कक्ष तयार केले असून तेथे स्वतंत्र डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी यांना 24 तास सेवा देण्यासाठी नियुक्त केले आहे. या सर्वांची निवासाची व्यवस्था हॉटेल रेयॉन्स येथे व हॉटेल एक्सप्रेस इन येथे करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकरी डॉ. शिंदे यांनी सांगितले.

घरी असताना घ्यावयाची खबरदारी आणि सुरक्षिततेचे उपाय #coronavirus #मीचमाझारक्षक#WarAgainstVirus#FightAgainstCoronavirus#COVID19

घरी असताना घ्यावयाची खबरदारी आणि सुरक्षिततेचे उपाय 
#coronavirus 
#मीचमाझारक्षक
#WarAgainstVirus
#FightAgainstCoronavirus
#COVID19

एखाद्या समुदायाच्या भेटीदरम्यान काय काळजी घ्यायला हवी? #coronavirus #मीचमाझारक्षक#WarAgainstVirus#FightAgainstCoronavirus#COVID19

एखाद्या समुदायाच्या भेटीदरम्यान काय काळजी घ्यायला हवी? 
#coronavirus 
#मीचमाझारक्षक
#WarAgainstVirus
#FightAgainstCoronavirus
#COVID19

राज्यात कोरोना निदान करणाऱ्या एकूण २३ प्रयोगशाळा कार्यरत



राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३०२ - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि ३१ : कोरोना निदानासाठी देशभरातील प्रयोगशाळांचे जाळे विस्तार करण्यात आला असून आयसीएमआरच्या अनुमतीने सध्या राज्यात १० शासकीय आणि १३ खाजगी अशा एकूण २३ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी सिद्ध झाल्या आहेत. यातील खाजगी प्रयोगशाळांकडील अहवालांचे मूल्यमापन करुन त्यानंतर त्यांचे अहवाल अंतिम करण्यात येत आहेत. आज राज्यात एकूण ८२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईतील मागील चार दिवसांमधील अहवालांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३०२ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये ५९ रुग्ण मुंबईचे आहेत, १३ रुग्ण मुंबई परिसरातील शहरी भागातील आहेत तर ५ रुग्ण पुण्याचे, ३ अहमदनगरचे आणि २ बुलढाणा येथील आहेत. आतापर्यंत ३९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील :-
मुंबई                                                      १५१
पुणे ( शहर व ग्रामीण भाग )                        ४८
सांगली                                               २५
मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा ३६
नागपूर                                        १६
यवतमाळ                                     ४
अहमदनगर                                    ८
बुलढाणा                       ३
सातारा, कोल्हापूर           प्रत्येकी  २
औरंगाबाद, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक प्रत्येकी  १
इतर राज्य - गुजरात १

एकूण ३०२ त्यापैकी ३९ जणांना घरी सोडले तर १० जणांचा मृत्यू

राज्यात आज एकूण ४०६ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत.   आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ हजार ३३१ नमुन्यांपैकी ५ हजार ७८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ३०२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ३९ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २३ हजार ९१३  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १४३४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत