Sunday, April 12, 2020

घरातील विलगीकरणाच्या वेळी भेदभावाची भावना ठेवू नका...

घरातील विलगीकरणाच्या वेळी भेदभावाची भावना ठेवू नका...
#coronavirus 
#COVID19
#मीचमाझारक्षक
#WarAgainstVirus
#FightAgainstCoronavirus

मास्कचा वापर कसा, केव्हा, कुठे करावा..? मास्कच्या वापरासंबंधी जाणून घ्या सर्व माहिती

मास्कचा वापर कसा, केव्हा, कुठे करावा..? 
मास्कच्या वापरासंबंधी जाणून घ्या सर्व माहिती... 👇
#coronavirus 
#COVID19
#मीचमाझारक्षक
#WarAgainstVirus
#FightAgainstCoronavirus

इटली ठरणार भारताचा भविष्यकाळ? मुक्ता बर्वेचे पत्रवाचन

प्रख्यात इटालियन लेखिका फ्रान्सेसका मेलँड्री या इटलीतील रोम शहरात अडकून पडल्या आहेत. त्यांनी एक खुलं पत्र युरोपियन देशांना उद्देशून लिहिलं आहे. From your Future असं या पत्राचं शीर्षक आहे. या पत्राचा मराठी अनुवाद लेखिकेची परवानगी घेऊन करण्यात आला आहे. मिलेनिअल मराठीने यासंदर्भातला व्हिडीओ प्रकाशित केला आहे. मुक्ता बर्वेने या मराठी पत्राचं वाचन केलं आहे. तर अभिनेते उदय सबनीस यांची या व्हिडीओला प्रस्तावना आहे.
Click up


काय म्हटलं आहे पत्रात?

“मी हे पत्र तुम्हाला इटलीतून म्हणजेच तुमच्या भविष्यकाळातून लिहिते आहे. करोनाची साथ ही अगदी आमच्या देशाप्रमाणेच तुमच्या देशातही एका विशिष्ट पद्धतीने पसरते आहे. त्यामुळे तुमचा प्रवासही आमच्यासारखाच असणार आहे. करोनाच्या बाबतीत वेळेचा विचार केला तर आम्ही तुमच्या पुढे आहोत. जसं वुहान होतं आमच्या काही आठवडे पुढे..

पाहा व्हिडीओ

Saturday, April 11, 2020

आज रोजी पालघर जिल्ह्यात 37 कोरोना पॉझिटीव्ह


पालघर जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 37 झाली आहे. मृतांचा आकडा 4 वर स्थीर ठेवण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. एकूण 49 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. त्यातील 33 जणांचे तपासणी अहवाल पॉझिटीव्ह असून 16 जणांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. पालघर तालुक्यातील 2 पॉझिटीव्ह, व वसई ग्रामीण क्षेत्रातील 3 पॉझिटीव्ह वगळता, उर्वरीत 32 कोरोना पॉझिटीव्ह हे वसई महानगर क्षेत्रातील आहेत.

228 तपासणी अहवाल निगेटिव्ह : एकूण 421 जणांचे घशाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून, आज रोजी पर्यंत, 265 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 228 नमुने निगेटिव्ह आले आहेत. 156 अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.

सध्या 49 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. एमसीजीएम रेस्ट हाऊस (अंधेरी) – 1; ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय – 9; जसलोक (मुंबई) – 5; एमजीआरएम (पवई) – 2; रहेजा हॉस्पिटल (मुंबई) – 1 (रुग्ण बरा झाल्याने सुट्टी दिली); बोळिंज हॉस्पिटल (वसई) – 13 (अहवाल प्राप्त नाही); डहाणू उप जिल्हा रुग्णालय – 2 (अहवाल प्राप्त नाही); ग्रामीण रुग्णालय (पालघर) – 2 (अहवाल प्राप्त नाही);रिद्धीविनायक हॉस्पिटल (नालासोपारा) 3; सेव्हन हिल्स हॉस्पिटल 7; हॉरिझोन प्राईम हॉस्पिटल (ठाणे) – 4; शताब्दी हॉस्पिटल (कांदिवली) – 1:

  • 81 जणांना इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन केलेले आहे.
  • 49 रुग्ण लक्षणे आढळल्यामुळे रुग्णालयात दाखल.
  • 421 जणांचे घशाचे नमुने घेतलेले आहेत.
  • 228 नमुने निगेटिव्ह.
  • 156 तपासणी अहवाल प्राप्त होणे बाकी बाकी आहे.
  • 37 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह. व त्यातील 4 पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यू.

रेशनिंगविषयी तक्रार आणि माहितीसाठी हेल्पलाईन




मुंबई, दि. 11 : कोरोना साथरोग नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत राज्यात रेशनिंगसाठी हेल्पलाईन कार्यरत करण्यात आली आहे. जनतेने रेशनिंग संदर्भातील तक्रारी आणि माहिती मिळविण्यासाठी 1800224950 किंवा 1967 या नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे.

लॉकडाऊन कालावधीत शिधावस्तू उपलब्धतेचे सनियंत्रण करताना रेशनिंग हेल्पलाईन बाबतीत जनतेत जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे दिसून आले आहे. रेशनिंगसाठीच्या तक्रारीसाठी/रेशनिंगची माहिती मिळविण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करा किंवा ईमेल वा ऑनलाईन तक्रार प्रणालीचा वापर करून आपली तक्रार नोंदवा, असे आवाहन जनतेस करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय हेल्पलाईन ही सकाळी10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार असून त्याचा हेल्पलाईन क्रमांक : 1800 22 4950/1967 (नि:शुल्क) आहे. अन्य हेल्पलाईन क्रमांक : 022- 23720582 / 23722970 / 23722483,ईमेल-helpline.mhpds@gov.in,ऑनलाइन तक्रार नोंदविण्यासाठीmahafood.gov.in या वेबसाईटवर ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली याचा वापर करा. तसेच मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्र नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले असून  हा कक्ष सकाळी 8 ते रात्री 8वाजेपर्यंत सुरु राहील. त्याचा हेल्पलाईन क्रमांक- 022-22852814,ईमेल-dycor.ho.mum@gov.in असा आहे.