Wednesday, May 27, 2020

भारतीय ‘मित्रों’ची टीक-टॉकला तगडी टक्कर; लाखोंच्या संख्येत झाले डाऊनलोड


शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टीक-टॉकचे रेटिंग काही दिवसांपुर्वी युजर्सने खराब रिव्ह्यू देऊन कमी केले होते. या अ‍ॅपवर बंदी घालण्याची देखील युजर्सने केली होती. याच पार्श्वभुमीवर आता मित्रों (Mitron) नावाचे एक भारतीय अ‍ॅप टिकटॉकला टक्कर देत आहे. आतापर्यंत 50 लाखांपेक्षा अधिक वेळा हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यात आले आहे. टीक-टॉक सारखेच फीचर्स मिळणाऱ्या या अ‍ॅपला आयआयटी रुडकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे.




आयआयटी रुडकीचा विद्यार्थी शिवांक अग्रवालने तयार केले असून, हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर टॉप फ्री चार्टच्या टॉप-10 समावेश झाले आहे. पेटीएमचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक यांच्याद्वारे करण्यात आलेल्या ट्विटमध्ये हे अ‍ॅप दुसऱ्या स्थानावर दिसत आहे. या अ‍ॅपमध्ये टीक-टॉक व्यतिरिक्त दुसरे कोणतेही खास फीचर्स नाहीत. मात्र आपल्या नाव आणि ब्रँडिंगमुळे लोकप्रिय होत आहे.

Image Credited – Forbes

अ‍ॅप नवीन असून, यात अनेक बग्स आहेत. असे असले तरी याला चांगले रिव्ह्यू मिळत आहेत. जवळपास 4.7 रेटिंग्स असणाऱ्या या अ‍ॅपमध्ये लॉग इन करताना समस्या येत असल्याचे अनेक युजर्सनी म्हटले आहे. मात्र भारतीय अ‍ॅप असल्याने भरपूर सपोर्ट मिळत आहे. 8 एमबीच्या या अ‍ॅपला 11 एप्रिल 2020 ला रिलीज करण्यात आले होते. सध्या केवळ गुगल प्लेवरच हे अ‍ॅप उपलब्ध आहे.

ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरा

मुख्यमंत्र्यांच्या शिक्षण विभागास सूचना

मुंबई, दि २६ : ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाच्या पर्यायाचा वापर मोठ्या प्रमाणावर करुन येत्या शैक्षणिक वर्षातील शिक्षणास सुरुवात करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

Maha Info Corona Website

शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, सर्वांना शिक्षण ही संकल्पना घेऊन आता आपण पुढे जाऊ. संपूर्ण साक्षरतेचा विचार करू. शिक्षणासाठी मोबाईल कंपन्यांचेही सहकार्य घेण्यात यावे. शालेय अभ्यासक्रम छोटा करण्याबाबत नियोजन करण्यात यावे. विद्यार्थ्यांना टॅब आणि स्टोरेज कार्डच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा पर्यायही आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी पायलट प्रोजेक्ट हाती घ्यावा. टीव्ही चॅनल्सचा यासाठी उपयोग करून घ्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले.

शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीला याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येत असून यासंदर्भात लोकप्रतिनिधी व शिक्षण क्षेत्रातील सर्वांशी समन्वय राखावा, सर्वांची मते विचारात घ्यावीत. यानिमित्ताने ऑनलाईन नेटवर्कही बळकट करून घ्यावे असेही मुख्यमंत्र्यांनी सुचविले.

यावेळी शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, प्रधान सचिव सौरभ विजय यांनी माहिती देतांना सांगितले की, बालभारतीने पीडीएफ स्वरूपात पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. दीक्षा ॲपचा वापरही वाढला असून व्हायरस वीर पुस्तक विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. गुगल क्लासरूमचा तसेच रेडिओ आणि कम्युनिटी रेडिओचा वापर करण्यात येणार आहे.शालेय पोषण आहार यासंदर्भात शाळांना स्वातंत्र्य देण्यात येत असून महाविद्यालये सुरू करण्याबाबतही नियोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

डहाणू शहरात पॉझिटिव्ह पाहुणीच्या संपर्कातील सर्व जण निगेटिव्ह


मुंबईतुन 4 दिवसांपूर्वी डहाणूतील केटी नगर येथील नातेवाईकांकडे आलेल्या 42 वर्षीय महिलेचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह तिचा मुलगा व त्या कुटूंबातील 3 जण अशा 4 जणांना क्वारन्टाईन करण्यात आले होते. महिलेवर उपचार करणाऱ्या फिनिक्स हॉस्पिटलचे एक डॉक्टर व 2 परिचारिका यांना देखील क्वारन्टाईन करण्यात आले होते. ह्या सर्व 7 जणांच्या घशाच्या नमुन्याची चाचणी केली असता, आज तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. डहाणूकरांच्या दृष्टीने ही बाब दिलासादायक ठरली आहे.

Friday, May 22, 2020

आजपासून पालघर जिल्ह्यात रिक्षा व बस सेवा सुरु! दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत!


पालघर जिल्ह्याचा वसई विरार महानगर क्षेत्राचा समावेश रेड झोन मध्ये ठेऊन जिल्ह्याचे उर्वरित क्षेत्र नॉन रेड झोन जाहीर करण्यात आले आहे. आजपासून नॉन रेड झोन क्षेत्रात बस सेवा व रिक्षा सेवा देखील सुरु करण्यात आली आहे. बस सेवा 50% प्रवासी क्षमतेवर चालेल तर रिक्षासेवा चालक अधिक 2 प्रवासी अशा क्षमतेने चालवली जाईल. बाजारपेठा व दुकाने मात्र आजपासून सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच सुरु राहतील. सायंकाळी 7 ते सकाळी 7 दरम्यानची संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. ह्या सर्व सवलती, प्रतिबंधीत क्षेत्रासाठी मात्र लागू असणार नाहीत.

Thursday, May 21, 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीमुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सढळ हाताने मदत करावी-जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोवीड-19 या नावाने खाते सुरु करण्यात आले आहे. जनतेंनी, दानशूर व्यक्तींनी, सेवा भावी संस्थानी तसेच विविध संघंटनांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
खात्याचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे:-
· खात्याचे नाव-मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोवीड 19
· बँकेचे बचत खाते क्र-39239591720
· स्टेट बैंक ऑफ इंडिया ,मुंबई मुख्य शाखा,फोर्ट, मुंबई 400023
· शाखा कोड-00300
· IFSC कोड - SBIN0000300
UPI ID – cmrfmahacovid19@sbi यावर देखील आपण कोवीड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहाय्यता निधी उपलब्ध करुन देऊ शकता.
जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर स्तरावर देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच CSR फंड कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. या बाबत आपणाला काही अडचणी उद्भवल्यास पुढील क्रमांकावर 02525-252520/02525-253111 संपर्क साधावा.
जनतेच्या सोईसाठी व ऐच्छिक दात्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर व तालुका स्तरावर तहसीलदार कार्यालय व गटविकास अधिकारी कार्यालय येथे धनादेश समक्ष अथवा ड्रॉपबॉक्स द्वारे (Dropbox ) स्विकारले जाऊन पोच पावती देण्यात येईल. ऐच्छिक दात्याना आवाहन करण्यात येते की, आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पुढाकार घेऊन कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सढळ हाताने मदत करावी, असे ही जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आवाहन केले.