दि. 13 जून : मागील 24 तासांत पालघर जिल्ह्यात 117 नव्या कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. सर्वाधिक 96 बाधीत एकट्या वसई विरार महानगर क्षेत्रातील आहेत. उर्वरीत 21 जण पालघरच्या ग्रामीण भागातील आहेत. त्यामध्ये पालघर तालुक्याच्या 10, जव्हार तालुक्याच्या 6, तलासरी व वाडा तालुक्यातील प्रत्येकी 2 व मोखाड्यातील 1 बाधीताचा समावेश आहे. तलासरीतील 2 व मोखाड्यातील 1 कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीमुळे पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
दि. 12 जून : काल पालघर जिल्ह्यामध्ये एका दिवसांत 108 नवे कोरोना रुग्ण निष्पन्न झाले होते. त्यातील 42 वसई विरार महानगर क्षेत्रातील तर 66 पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील होते. धक्कादायक म्हणजे ग्रामीण भागातील 66 रुग्णांमध्ये 38 स्त्रीयांचा समावेश आहे. आज वसई महानगर क्षेत्रातील कोरोनाबाधीतांची संख्या समजू शकली नसली तरी, ग्रामीण भागात 35 नवे कोरोना रुग्ण आढळले असून त्यातील तब्बल 25 स्त्रीया आहेत.
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे निष्पन्न होत असून 11 जून रोजी पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एका दिवसांत 66 नवे कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. विक्रमगड तालुक्यात सर्वाधिक 33, वाडा तालुका 21, वसई तालुका 8, पालघर तालुका 3 व डहाणू तालुका 1 अशी नव्या कोरोना बाधीतांची तालुकानिहाय संख्या आहे.
आजमितीस पालघर जिल्ह्यात 1585 कोरोना पॉझिटीव्ह व्यक्ती आढळल्या आहेत. त्यातील 809 व्यक्ती संसर्गमुक्त झाल्या असून 724 रुग्णांवर उपचार चालू आहेत. 52 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गित व्यक्तींची तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:- • वसई विरार महानगरपालिका क्षेत्र –1288 (46 मृत्यू) • वसई ग्रामीण तालुका –64 (3 मृत्यू) • पालघर तालुका – 105 (3 मृत्यू) • विक्रमगड तालुका – 43 • डहाणू तालुका – 41 • वाडा तालुका – 41 • जव्हार तालुका – 3
पालघर जिल्ह्यातील 809 कोरोनासंसर्गीत व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. अशा कोरोनामुक्त झालेक्या व्यक्तींची तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:- • वसई विरार महानगरपालिका क्षेत्र –708 • वसई ग्रामीण तालुका –34 • पालघर तालुका – 42 • डहाणू तालुका – 19 • वाडा तालुका – 5 • जव्हार तालुका – 1