Saturday, July 18, 2020

पालघर जिल्ह्यात 24 तासांत 402 नवे रुग्ण – 211 कोरोना मृत्यू !


दि. 17 जुलै: पालघर जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे मागील 6 दिवसांत 33 जणांनी आपले प्राण गमावले असून मृत्यूंची संख्या 211 झाली आहे. आतापर्यंत सर्वाधिक 184 मृत्यू वसई विरार महानगर क्षेत्रातील असून वसई ग्रामीण क्षेत्रात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पालघर तालुक्यात 3 मृत्यू वाढले असून संख्या 11 झाली आहे. जव्हार तालुक्यात 2 मृत्यू, वाडा तालुक्यात 2 मृत्यू ही संख्या कायम असून विक्रमगड तालुक्यात 1 कोरोना संसर्गामुळे 1 मृत्यू वाढून संख्या 2 झाली आहे.

जिल्ह्यामध्ये 6 दिवसांत 1731 कोरोनाग्रस्तांची भर पडली असली तरी, 986 रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या मात्र 727 ने वाढली आहे. 12 जुलै रोजी 2514 जण रुग्णालयात दाखल होते. आज ही संख्या 3231 इतकी वाढली आहे.

पालघर जिल्ह्याच्या वसई तालुका वगळता उर्वरीत भागात, 6 दिवसांत कोरोनाग्रस्तांची संख्या 242 ने वाढून 1604 झाली आहे. मृत्यूचा आकडा 4 ने वाढून 17 झाला आहे.

तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:-

पालघर तालुक्यात 6 दिवसांत 109 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 676 झाला आहे. त्यातील 489 जण बरे झाले असून 176 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 3 ने वाढून 11 झाली आहे.

वाडा तालुक्यात 6 दिवसांत 8 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 314 झाला आहे. त्यातील 252 जण बरे झाले असून 52 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 2 कायम राहिली आहे.

जव्हार तालुक्यात 6 दिवसांत 2 नवा रुग्ण आढळला असून एकूण आकडा 154 झाला आहे. त्यातील 146 जण बरे झाले असून 6 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 2 राहिली आहे.

विक्रमगड तालुक्यात 6 दिवसांत 5 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 124 झाला आहे. त्यातील 111 जण बरे झाले असून 11 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 1 ने वाढून 2 झाली आहे.

डहाणू तालुक्यात 6 दिवसांत 64 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 226 झाला आहे. त्यातील 135 जण बरे झाले असून 91 जणांवर उपचार चालू आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही. येथे मागील 24 तासांत नवे 27 रुग्ण निष्पन्न झाले.

मोखाडा तालुक्यात 6 दिवसांत नवा एकही रुग्ण आढळला नसून एकूण आकडा 30 कायम आहे. त्यातील सर्व जण बरे झाले आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही.


तलासरी तालुक्यात 6 दिवसांत 55 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 80 झाला आहे. त्यातील 22 जण बरे झाले असून 58 जणांवर उपचार चालू आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही. येथे मागील 24 तासांत 48 रुग्ण निष्पन्न झाले.

Friday, July 17, 2020

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना






केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मागील वर्षी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला ६ हजार रुपये देणार आहे. दोन हजार रुपयांच्या हफ्त्याने ही रक्कम दिली जाणार आहे. या योजनेचे दोन टप्पे पार पडले आहेत. या योजनेतून मिळणारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. आपल्या खात्यात जमा होणाऱ्या पैशांची माहिती आपणास व्हावी यासाठी सरकारने ऑनलाईन सेवा प्रदान केली आहे. यातून आपण सर्व माहिती मिळवू शकता.

पंतप्रधान शेतकरी योजनेसाठी कसा कराल नोंदणी /अर्ज

या योजनेसाठी अर्ज करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सर्वप्रथम तुम्ही भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर www.pmkisan.gov.in/ जा. आणि पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या योजनेसाठी स्वत:च्या नावाची नोंदणी करा. https://www.pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx  येथे शेतकऱ्यांची नोंदणी अर्ज भरणे आणि स्वत:ची नोंदणी करावी. याशिवाय शेतकरी महसूल अधिकारी किंवा पंतप्रधान शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याकडे संपर्क करु शकता. किंवा आपल्या जवळील सामान्य सेवा केंद्रा (सीएससी)वर जाऊ शकतात. आणि किमान समर्थन योजनेसाठी अर्ज करु शकता.

पंतप्रधान शेतकरी योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे

  • आधार कार्ड.
  • बँक खाते.
  • सातबारा उतारा.
  • रहिवाशी दाखला.

नोंदणी झाल्यानंतर www.pmkisan.gov.in/ या लिंकवर जाऊन अर्ज, देयक, आणि इतर तपशीलाची चौकशी करत रहावी.

पंतप्रधान किसान पोर्टलवर किसान कॉर्नर (शेतकरी कॉर्नर) या पर्यायात खालील अजून काही सुविधा आहेत.

  • नवीन शेतकरी नोंदणी.
  • आधार कार्ड रिकॉर्ड संपादित करा.
  • लाभार्थ्यांची स्थिती.
  • स्व :नोंदणी/ सीएससीची स्थिती.
  • पीएम किसान अ‍ॅप डाऊनलोड करा.

पंतप्रधान शेतकरी निधी योजनेची स्थिती आणि लाभार्थ्यांची यादीची चौकशी कशी कराल

  • पंतप्रधान शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईट - www.pmkisan.gov.in/ वर जा.
  • मेनू बार वर असलेल्या किसान कॉर्नर (शेतकरी कॉर्नर) वर क्लिक करा.
  • आता या लिंकवर क्लिक करा ज्यात लाभार्थींची स्थिती आणि लाभार्थी यादी आहे. त्यात तुम्ही चौकशी करू शकता.  
  • जर तुम्ही लाभार्थी यादीची चौकशी करत असाल तर तुम्ही आपले राज्य, जिल्हा, उप- जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव तेथे टाका.
  • मग अहवाल मिळवा वर क्लिक करा.

पंतप्रधान शेतकरी योजनेचा लाभार्थींची स्थिती येथे पहा https://bit.ly/2TvLBPi

पंतप्रधान शेतकरी योजनेचे लाभार्थ्यांची यादी येथे पहा https://bit.ly/2TvQYxV

स्वंय नोंदणी  सीएससी शेतकरीची स्थिती येथे पहा https://bit.ly/2VSYdBm

काही दिवसांपुर्वी सरकारने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी एक पंतप्रधान शेतकरी मोबाईल अ‍ॅप  लॉन्च केले होते. यात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. कोणत्याही प्रकारच्या समसा आल्यास शेतकरी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. पंतप्रधान शेतकरी हेल्पलाईन नंबर 155261/1800115526 (टोल-फ्री), 011-23381092

मिनिमम बॅलन्सच्या नियमांमध्ये ‘या’ बँकांनी केले मोठे बदल


मिनिमम बॅलन्स आणि पैशांच्या व्यवहाराच्या नियमांत देशातील काही प्रमुख बँकांनी मोठे बदल केले आहेत. 1 ऑगस्टपासून किमान शिल्लक शुल्क रक्कम न ठेवल्यास त्यावर शुल्क आकारण्याची घोषणा या बँकांनी केली आहे. बँकेने हे नियम डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी बदलल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या बँकांमध्ये तीन विनामूल्य व्यवहारानंतर शुल्कदेखील वसूल केले जाणार आहे. 1 ऑगस्टपासून बँक ऑफ महाराष्ट्र, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि आरबीएल बँकेकडून हे शुल्क लागू करण्यात येणार आहे.


किमान 2 हजार रुपये बँक ऑफ महाराष्ट्रमधील बचत खातेदारांना त्यांच्या खात्यात मेट्रो आणि शहरी भागात ठेवणे आवश्यक आहे, ज्याची मर्यादा याआधी 1,500 रुपये होती. उर्वरित रक्कम 2000 रुपयांपेक्षा कमी असल्यास बँक मेट्रो आणि शहरी भागात 75 रुपये, निम-शहरी भागात 50 रुपये आणि ग्रामीण भागात दरमहा 20 रुपये शुल्क आकारणार आहे.

100 रुपयांपर्यंत शुल्क बँक ऑफ महाराष्ट्रच्या सर्व शाखांमध्ये एका महिन्यात तीन विनामूल्य व्यवहारानंतर ठेव आणि पैसे काढण्यासाठी आकारले जाणार आहे. तसेच लॉकरसाठी ठेवीची रक्कम कमी केली गेली आहे. परंतु लॉकरवरील दंड वाढविण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना बँक ऑफ महाराष्ट्रचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एएस राजीव म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल बँकिंगला चालना देण्यासाठी, त्याचबरोबर बँकेत कमी लोक यावेत, यासाठी सध्या हे सर्व बँक करीत आहे. त्याचबरोबर बँकेच्या सेवा शुल्कातही काही बदल करण्यात आले आहेत.

तसेच अ‍ॅक्सिस बँक खातेदारांना आता ECS व्यवहारांवरील प्रत्येक व्यवहारावर 25 रुपये द्यावे लागतील. पूर्वी कोणतेही शुल्क ECS व्यवहारांवर आकारले जात नव्हते. खासगी बँकेने 10/20 रुपये आणि 50 रुपये बंडलप्रमाणे 100 रुपये प्रति बंडलसाठी हँडलिंग शुल्क आकारणार आहे.

कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहकांनी एटीएममधून महिन्याला पाच वेळा पैसे काढल्यानंतर पुढच्या व्यवहारात रोख रक्कम काढण्यावर 20 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच गैर-आर्थिक व्यवहारावर 8.5 रुपये शुल्क असेल. खात्यात शिल्लक रक्कम कमी असल्याने व्यवहार अयशस्वी झाल्यास 25 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. कोटक महिंद्रा बँकेतील खातेदारांना खाते श्रेणीनुसार किमान शिल्लक बॅलन्स न ठेवल्यास दंड भरावा लागेल. याव्यतिरिक्त प्रत्येक चौथ्या व्यवहारासाठी प्रतिव्यवहार 100 रुपये रोख पैसे काढण्याची फी सुरू केली गेली आहे.

अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी डहाणू ते चर्चगेट लोकल


अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पहाटे ४.४० वाजता डहाणू ते चर्चगेट लोकल सोडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. शुक्रवारपासून (१७ जुलै) ही फे री सेवेत येईल. यासाठी काही लोकल फेऱ्यांच्या वेळेत व अंतिम स्थानकात बदल केले आहेत.


पश्चिम रेल्वेच्या पालघर, डहाणू, वैतरणा, बोईसर या भागांतून मुंबईच्या दिशेने पहाटेच्या सुमारास मेमू व लोकल चालवण्यात येतात. परंतु पहाटे ५ वाजताची डहाणू ते बोरीवली मेमू गाडी ही ५.४० वाजता डहाणू ते विरार लोकल म्हणून चालवण्यात येत आहे. त्यामुळे विरारला उतरुन पुन्हा मुंबईच्या दिशेने लोकल पकडावी लागते. परिणामी कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होतो. अनेक परिचारिका, वॉर्डबॉय यांनी ही वेळ आणि लोकलचे अंतिम स्थानक बदलण्याची मागणी केली होती. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही हीच मागणी उचलून धरली. त्यानुसार हा बदल करण्यात येत आहे.

१७ जुलैपासून पहाटे ४.४० वाजता डहाणू ते विरार अशी गाडी चालवली जाईल, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकू र यांनी सांगितले. त्यानंतर पहाटे ५.४० वाजता डहाणू रोड ते विरार गाडी असेल. त्याआधीही पहाटे ४.१५ वाजता विरार ते डहाणू रोड आणि सकाळी ७.४० वाजता चर्चगेट ते डहाणू रोड गाडी चालवण्यात येणार आहे. पहाटेच्या ४.४० च्या लोकलमुळे अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे खासदार सावंत यांनी सांगितले.

महाजॉब्स पोर्टल


  •    .महाजॉब्स पोर्टल वर नोंदणी कशी कराल ?
  • महाजॉब्स पोर्टल वर आपण मोफत नोंदणी करू शकता. प्रथम तुमचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी ही माहिती भरा. त्यानंतर मोबाईल किंवा ईमेल आयडीवर ओटीपी क्रमांक येईल. तो ओटीपी क्रमांक मॅच झाल्यास तुमच्या नावाने नोंदणी होईल.

 

  • महाजॉब्स काय आहे?
महाजॉबच्या रूपाने औद्योगिक रोजगार ब्युरो म्हणून कंपन्या व कुशल अर्धकुशल व अकुशल कामगारांमधील महा दुवा महाराष्ट्र शासनाने निर्माण केला आहे. जिथे महाराष्ट्रातील सर्व कुशल अर्धकुशल व अकुशल कामगारांना सतरा क्षेत्रात 950 अधिक व्यवसायामध्ये रोजगाराची एक अतिशय मोठी संधी आहे

 

  • महाजॉब्सवर नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे लागतील?
खालील कागदपत्रे सोबत ठेवावी: १. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल) अपलोड करणे अनिवार्य आहे. २. शैक्षणिक प्रमाणपत्र ३. कौशल्य प्रमाणपत्र ४. फोटो

 संकेतस्थळवर जा: https://mahajobs.maharashtra.gov.in/