Saturday, July 18, 2020

कोरोना पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-गुजरात बॉर्डर सील करण्यात आले.

कोरोना पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-गुजरात बॉर्डर सील करण्यात आले. खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती आहे.

वेदांतामधून एक कोरोनाग्रस्त रुग्ण पळाला, एका रुग्णावर गुन्हा दाखल झाला

दि. 17 जुलै: डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथील वेदांता हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण दाखल होता. त्याच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता अहवाल पॉझिटीव्ह आला. हा रुग्ण वेदांतामध्ये उपचार न घेता तेथून पळून गेल्याचे निष्पन्न झाले आहे. ह्या प्रकरणी वेदांतच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने कासा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा (क्र. 121/2020) दाखल केला आहे. त्याच्या पळून जाण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

तलासरी तालुक्यात 48 कोरोना रूग्ण बाधित व 1 रुग्णाचा मृत्यू

तलासरी तालुक्यात 48 कोरोना रूग्ण बाधित व 1 रुग्णाचा मृत्यू झाला.

पालघर जिल्ह्यात 24 तासांत 402 नवे रुग्ण – 211 कोरोना मृत्यू !


दि. 17 जुलै: पालघर जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे मागील 6 दिवसांत 33 जणांनी आपले प्राण गमावले असून मृत्यूंची संख्या 211 झाली आहे. आतापर्यंत सर्वाधिक 184 मृत्यू वसई विरार महानगर क्षेत्रातील असून वसई ग्रामीण क्षेत्रात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पालघर तालुक्यात 3 मृत्यू वाढले असून संख्या 11 झाली आहे. जव्हार तालुक्यात 2 मृत्यू, वाडा तालुक्यात 2 मृत्यू ही संख्या कायम असून विक्रमगड तालुक्यात 1 कोरोना संसर्गामुळे 1 मृत्यू वाढून संख्या 2 झाली आहे.

जिल्ह्यामध्ये 6 दिवसांत 1731 कोरोनाग्रस्तांची भर पडली असली तरी, 986 रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या मात्र 727 ने वाढली आहे. 12 जुलै रोजी 2514 जण रुग्णालयात दाखल होते. आज ही संख्या 3231 इतकी वाढली आहे.

पालघर जिल्ह्याच्या वसई तालुका वगळता उर्वरीत भागात, 6 दिवसांत कोरोनाग्रस्तांची संख्या 242 ने वाढून 1604 झाली आहे. मृत्यूचा आकडा 4 ने वाढून 17 झाला आहे.

तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:-

पालघर तालुक्यात 6 दिवसांत 109 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 676 झाला आहे. त्यातील 489 जण बरे झाले असून 176 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 3 ने वाढून 11 झाली आहे.

वाडा तालुक्यात 6 दिवसांत 8 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 314 झाला आहे. त्यातील 252 जण बरे झाले असून 52 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 2 कायम राहिली आहे.

जव्हार तालुक्यात 6 दिवसांत 2 नवा रुग्ण आढळला असून एकूण आकडा 154 झाला आहे. त्यातील 146 जण बरे झाले असून 6 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 2 राहिली आहे.

विक्रमगड तालुक्यात 6 दिवसांत 5 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 124 झाला आहे. त्यातील 111 जण बरे झाले असून 11 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 1 ने वाढून 2 झाली आहे.

डहाणू तालुक्यात 6 दिवसांत 64 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 226 झाला आहे. त्यातील 135 जण बरे झाले असून 91 जणांवर उपचार चालू आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही. येथे मागील 24 तासांत नवे 27 रुग्ण निष्पन्न झाले.

मोखाडा तालुक्यात 6 दिवसांत नवा एकही रुग्ण आढळला नसून एकूण आकडा 30 कायम आहे. त्यातील सर्व जण बरे झाले आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही.


तलासरी तालुक्यात 6 दिवसांत 55 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 80 झाला आहे. त्यातील 22 जण बरे झाले असून 58 जणांवर उपचार चालू आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही. येथे मागील 24 तासांत 48 रुग्ण निष्पन्न झाले.

Friday, July 17, 2020

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना






केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मागील वर्षी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला ६ हजार रुपये देणार आहे. दोन हजार रुपयांच्या हफ्त्याने ही रक्कम दिली जाणार आहे. या योजनेचे दोन टप्पे पार पडले आहेत. या योजनेतून मिळणारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. आपल्या खात्यात जमा होणाऱ्या पैशांची माहिती आपणास व्हावी यासाठी सरकारने ऑनलाईन सेवा प्रदान केली आहे. यातून आपण सर्व माहिती मिळवू शकता.

पंतप्रधान शेतकरी योजनेसाठी कसा कराल नोंदणी /अर्ज

या योजनेसाठी अर्ज करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सर्वप्रथम तुम्ही भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर www.pmkisan.gov.in/ जा. आणि पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या योजनेसाठी स्वत:च्या नावाची नोंदणी करा. https://www.pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx  येथे शेतकऱ्यांची नोंदणी अर्ज भरणे आणि स्वत:ची नोंदणी करावी. याशिवाय शेतकरी महसूल अधिकारी किंवा पंतप्रधान शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याकडे संपर्क करु शकता. किंवा आपल्या जवळील सामान्य सेवा केंद्रा (सीएससी)वर जाऊ शकतात. आणि किमान समर्थन योजनेसाठी अर्ज करु शकता.

पंतप्रधान शेतकरी योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे

  • आधार कार्ड.
  • बँक खाते.
  • सातबारा उतारा.
  • रहिवाशी दाखला.

नोंदणी झाल्यानंतर www.pmkisan.gov.in/ या लिंकवर जाऊन अर्ज, देयक, आणि इतर तपशीलाची चौकशी करत रहावी.

पंतप्रधान किसान पोर्टलवर किसान कॉर्नर (शेतकरी कॉर्नर) या पर्यायात खालील अजून काही सुविधा आहेत.

  • नवीन शेतकरी नोंदणी.
  • आधार कार्ड रिकॉर्ड संपादित करा.
  • लाभार्थ्यांची स्थिती.
  • स्व :नोंदणी/ सीएससीची स्थिती.
  • पीएम किसान अ‍ॅप डाऊनलोड करा.

पंतप्रधान शेतकरी निधी योजनेची स्थिती आणि लाभार्थ्यांची यादीची चौकशी कशी कराल

  • पंतप्रधान शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईट - www.pmkisan.gov.in/ वर जा.
  • मेनू बार वर असलेल्या किसान कॉर्नर (शेतकरी कॉर्नर) वर क्लिक करा.
  • आता या लिंकवर क्लिक करा ज्यात लाभार्थींची स्थिती आणि लाभार्थी यादी आहे. त्यात तुम्ही चौकशी करू शकता.  
  • जर तुम्ही लाभार्थी यादीची चौकशी करत असाल तर तुम्ही आपले राज्य, जिल्हा, उप- जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव तेथे टाका.
  • मग अहवाल मिळवा वर क्लिक करा.

पंतप्रधान शेतकरी योजनेचा लाभार्थींची स्थिती येथे पहा https://bit.ly/2TvLBPi

पंतप्रधान शेतकरी योजनेचे लाभार्थ्यांची यादी येथे पहा https://bit.ly/2TvQYxV

स्वंय नोंदणी  सीएससी शेतकरीची स्थिती येथे पहा https://bit.ly/2VSYdBm

काही दिवसांपुर्वी सरकारने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी एक पंतप्रधान शेतकरी मोबाईल अ‍ॅप  लॉन्च केले होते. यात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. कोणत्याही प्रकारच्या समसा आल्यास शेतकरी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. पंतप्रधान शेतकरी हेल्पलाईन नंबर 155261/1800115526 (टोल-फ्री), 011-23381092