Sunday, August 2, 2020

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ८ अ‘ सुविधेचा ऑनलाईन शुभारंभ

महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागामार्फत आजपासून ‘डिजिटल ८ अ‘ ऑनलाईन सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ‘डिजिटल ८ अ‘सुविधेचा ऑनलाईन शुभारंभ  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आज करण्यात आला.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ऑनलाईन शुभारंभ केल्यानंतर सर्वांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित महसूल विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

श्री. थोरात यावेळी म्हणाले, शासकीय कामात महसूल विभागाची महत्त्वाची भूमिका आहे आणि म्हणूनच या विभागाला प्रशासनाचा कणा असे म्हणतात. महाराष्ट्राच्या विकासात आजपर्यंत या विभागाने महत्त्वाचे योगदान दिले असून यापुढील काळातही हा विभाग सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविण्यात पुढे राहील असा विश्वास आहे. गेला ४ महिन्यापेक्षा अधिकचा काळ आपण सर्व कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काम करीत आहोत, या काळात राज्यातील महसूल यंत्रणा सक्षमपणे काम करीत होती याचा मला अभिमान वाटतो.

सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख, शांती आणणारा हा विभाग आहे. त्यामुळेच अनेक जबाबदाऱ्या महसूल विभागावर सोपविण्यात येतात. आजपर्यंत साडेसतरा लाखांहून अधिक लोकांनी ‘डिजिटल  ७/१२‘ घेतला आहे त्याचप्रमाणे आता ‘डिजिटल ८ अ‘ ला सुद्धा असाच प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे.  महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया असेही आवाहन श्री. थोरात यांनी केले.

विमाकवच गमावण्याची भात उत्पादकांना भीती

विमाकवच गमावण्याची भात उत्पादकांना भीती

Online Admission Form for (2020-21)for junior college of science, Zari


GYANMATA ADIVASI JUNIOR COLLEGE OF SCIENCE, ZARI Online Admission Form for (2020-21) 

Saturday, August 1, 2020

कसा भरायचा अकरावी ऑनलाइन अर्ज

अकरावी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. यावर्षी ११ वी प्रवेशाचा रेजिस्ट्रेशन फॉर्म स्वतः मोबाईल/कॉम्पुटरवर ऑनलाइन भरायचा आहे. लॉकडाऊन असल्यामुळे कदाचित शाळांची मदत विद्यार्थ्यांना फार मोठ्या प्रमाणावर होणार नाही. त्यामुळे विद्यार्थी-पालकांनी काळजीपूर्वक ऑनलाइन अर्ज कसा भरायचा ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

ऑनलाइन अर्ज कसा भराल:-


https://mumbai.11thadmission.org.in/Registration/Registration.aspx या लिंकवर क्लिक करावे.

सर्व प्रथम वरील लिंकवर क्लिक करा एक फॉर्म दिसेल.

1. एमएमआर रिजनमधील विद्यार्थ्यांनी Within MMR Area वर क्लिक करा. इतरांनी Outside MMR Area तर महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांनी Outside Maharashtra Area या पर्यायावर क्लिक करा.

2. Fresher वर क्लिक करा.

3. SSC वर क्लिक करा.

4.Seat No. बॉक्स मध्ये तुमचा स्वतःचा 10वी परीक्षा बैठक क्र.(Seat No.) लिहा.
उदा. A011025.

5. Seat No.च्या खाली लाल रंगातील Get SSC Data वर क्लिक करा.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे उद्घाटन

6. तुमचे पूर्ण नाव, आईचे नाव व इतर माहिती तुम्हाला दिसेल.

7. Mobile Number बॉक्स मध्ये तुमचा चालू असलेला मोबाईल नं. टाका.

8. Security Question पुढे Select ला क्लिक करा त्यातील एक प्रश्न निवडा, त्याच्या पुढच्या बॉक्स मध्ये त्या प्रश्नाचे उत्तर लिहा.

उदा. What is the name of your grandfather?
पुढच्या बॉक्स मध्ये तुमच्या आजोबांचे नाव लिहा.
(तुम्ही कोणताही प्रश्न निवडू शकता व त्याचे उत्तर लिहून तो प्रश्न व उत्तर लक्षात ठेवा)

9. तुमच्या 11वी ऍडमिशन फॉर्मचा पासवर्ड तुम्ही सेट करा पुढच्या बॉक्स मध्ये परत तोच पासवर्ड लिहा व लगेच ते वहीत लिहून घ्या व लक्षात ठेवा.

10. CAPCHA CODE बॉक्स मध्ये त्या बॉक्स खाली जे दिसते आहे सेम तसेच पाहून लिहा(टाईप करा)

11. वरील तुम्ही दिलेली सर्व माहिती बरोबर असेल तर परत एकदा चेक करून खालील हिरव्या Register बटन वर क्लिक करा.

पालघर वर्धापन दिन व १ ऑगस्ट महसुल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सागरी-डोंगरी आणि नागरी अंग असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन, त्यामधून वेगळा झालेला पालघर हा महाराष्ट्र राज्यातला ३६वा जिल्हा १ आॅगस्ट २०१४ रोजी अस्तित्वात आला..कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पूर्वेकडे असणाऱ्या सहयाद्री पर्वताच्या रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राची किनारपट्टी या दरम्यान पसरला आहे. 
पालघर वर्धापन दिन व १ ऑगस्ट महसुल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐