Monday, July 25, 2022

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तर्फे पदवी, पदविका आणि उच्च पदवी चा प्रवेश प्रक्रिया

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तर्फे पदवी, पदविका आणि   उच्च पदवी चा प्रवेश प्रक्रिया
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तर्फे पदवी, पदविका आणि   उच्च पदवी चा प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. लोकांच्या किंवा व्यक्तीच्या  सामाजिक, राजकीय आर्थिक इ. परिस्थितीमुळे काही लोकांना किंवा व्यक्तींना शिक्षण पूर्ण करता आले नाही त्या लोकांना किंवा व्यक्तींना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यामुळे शैक्षणिक पदव्या उपलब्ध करण्यात आले आहे.
  
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तर्फे कला, वाणिज्य आणि विज्ञानाच्या पदविका, पदवी आणि उच्च पदवी इ. उपलब्ध करण्यात आल्या आहे.

Friday, July 15, 2022

पंतप्रधान पिक विमा योजना

पंतप्रधान पिक विमा योजना यासाठी माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पिकपेरा



Coming soon...

Sunday, July 3, 2022

राज्यात पंतप्रधान पीकविमा योजनेचा (PMFBY)लाभ घ्यायचा असेल तर आजपासून

पंतप्रधान पीकविमा योजनेचा (PMFBY)लाभ घ्यायचा असेल तर खरीप पिकांच्या विम्याच्या शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. ज्या कर्जदार शेतकऱ्यांना विमा सुविधा नको असेल त्यांनी शेवटच्या तारखेच्या 7 दिवस आधी त्यांच्या बँक शाख्यात लेखी कळवावे. कर्ज न घेतलेले शेतकरी सीएससी सेंटर, बँक, एजेंट मार्फत किंवा विमा पोर्टलवर पीक विमा स्वतः करू शकतात. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांची नुकसान भरपाई मिळते. हवामानातील अचानक बदल किंवा पावसाळ्याच्या वेळी बऱ्याच शेतकऱ्यांची मेहनतीची कमाई ही काही क्षणातच वाया जाते. शेतकऱ्याची ही समस्या विचारात घेऊन भारत सरकारने 13 जानेवारी 2016 रोजी या योजनेची सुरुवात केली.

पीक विमा योजनेत कोणत्या कारणांसाठी नुकसानभरपाई मिळते?

पीक विमा योजनेतंर्गत गारपीट, जमिन धसने,पाणी साचणे, ढगफुटी व नैसर्गिक आगीमुळे होणाऱ्या शेतीनिहाय नुकसानाचे मूल्यांकन करून नुकसान भरपाई दिले जाते. नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यावर केन्द्र सरकाराने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी फेब्रुवारी2016 मध्ये अत्यंत महत्वकांक्षी 'पंतप्रधान पीक विमा योजना ' सुरू केली.


पीक विमा योजनेमध्ये(PMFBY) कशी नुकसानभरपाई मिळते?

पेरणीच्या 10 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना पीएमएफबीवायचा अर्ज भरावा लागतो. नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचे पीक खराब झाले असेल, तरच विमा रकमेचा लाभ मिळतो. पेरणीपासून तर काढणी दरम्यान उभ्या पिकांचे जर नैसर्गिक आपत्ती, रोग आणि कीटकांच्या प्रादुर्भावमुळे नुकसान झाले असेल 
तर या विम्याचा लाभ मिळतो. तसेच उभ्या पिकाचे जर स्थानिक आपत्ती,गारपीट,दरड कोसळणे, ढग फुटी, वीज पडल्यामुळे नुकसान झाले तर याचा लाभ मिळतो, तसेच पीक काढल्यानंतर पुढील 14 दिवसापर्यंत शेतात सुकवण्यास ठेवलेल्या पिकांवर जर अवेळी मौसमी चक्रीवादळ, गारा व वादळाचा प्रादुर्भाव झाला तर नुकसान भरपाई दिली जाते. तसेच प्रतिकूल हंगामी परिस्थितीमुळे पिकांची पेरणी झाली नसेल तर देखील या विम्यापासून लाभ मिळतो.


किती प्रिमीयम भरावा लागतो?
खरीप पिकांसाठी प्रत्येकी 2% प्रीमियम आणि रब्बी पिकांसाठी प्रत्येकी 1.5% प्रिमियम भरावा लागतो.  पीएमएफबीवाय योजनेचा व्यावसायिक आणि बागाईत पिकांसाठी विमा संरक्षण देखील प्रदान करते. यात शेतकऱ्यांना 5% प्रीमियम भरावा लागतो.


लाभ मिळण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागतात?

शेतकऱ्यांना एक फोटो, ओळखपत्र, निवासाचा पत्ता म्हणून पुरावा, 7/12 उतारा, शेतातील पुरावा द्यावा लागतो. दाव्यासाठी शेतकऱ्यांचा पीक विमा कंपनीच्या टोल फ्री नंबर किंवा विमा कंपनी व कृषी विभागाच्या संपर्क साधू शकतात. यात 72 तासाचा कालावधी निश्चित केला आहे. नुकसान झाल्यास शेतीनिहाय नुकसानाचे मूल्यांकन करून पैसे दिले जातात.

Monday, June 27, 2022

Diploma in Pharmacy Admissions Process 2022


शैक्षणिक पात्रता:
1.बारावी पास
2.LC
3.अधिवास दाखला
4.जातीचा दाखला
5.Caste validity
6.आधार कार्ड
7.रेशन कार्ड
8.ई-मेल व मोबाईल न
9.फोटो