Saturday, August 6, 2022
Epeek pahani 2022 | माझा सातबारा मीच नोंदविणार पीक पेरा
ई पीक पाहणी – कशी करायची | E peek pahani 2022
सोप्पी व सुलभ ई-पीक पाहणी सुधारित मोबाईल ऍपमध्ये – E peek Pahani 2022
सन २०२१ मध्ये खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये या प्रकल्पा अतर्गत शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या आपल्या पिकांची नोंदणी pik pera करून या प्रकल्पास उत्तम प्रतिसाद दिलेला आहे.
गतवर्षी खरीप हंगामा ( kharip 2021 ) मध्ये ९९ लाख ५७ हजार ९४४ हेक्टर, रब्बी हंगामामध्ये २२ लाख, ५२ हजार ५६ हेक्टर, उन्हाळी हंगामामध्ये २ लाख ९१ हजार १३३ हेक्टर क्षेत्रावर तर बहुवार्षिक पिकांतर्गत ४४ लाख १२ हजार ३८६ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ऍप ( E pik pahani application ) द्वारे पिकांची नोंदणी केली आहे.
त्याचप्रमाणे ई-पीक पाहणी ऍप ( E-peek pahani ) द्वारे ४०० च्यावर वेगवेगळ्या पिकांच्या नोंदी घेण्यात आलेल्या असून खरीप हंगाम २०२२ करीता राज्यात ई-पीक पाहणी मोबाईल अँप्लिकेशन नोंदविण्याची कार्यवाही १ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होत आहे.
या साठी मोबाईल ऍप्लिकेशन व्हर्जन-२ विकसित हे सुधारित E peek Pahani New Version – E peek pahani 3.1 5 मोबाईल एप्लिकेशन १ ऑगस्ट २०२२ पासून शेतकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ई-पीक पहाणीमध्ये नोंदीसाठी ई पीक पहाणी मोबाईल ॲप व्हर्जन-2 नव्याने या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाईलमधील जुने ॲप डिलीट करुन https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova या लिंकद्वारे गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई पीक पहाणी मोबाईल ॲप व्हर्जन-2 हे नवीन ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे.
सुधारित मोबाईल अॅपमध्ये ( E pik Pahani New Version ) राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट ( geo tagging ) करण्यात आले असून शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करताना पिकाचा फोटो घेतील त्यावेळी छायाचित्र घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्याबाबतचा संदेश मोबाईल अॅपमध्ये दर्शविण्यात येणार आहे. या सुविधेमुळे पिकाचे अचूक छायाचित्र घेतले किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे.
शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकांबाबत माहितीमध्ये स्वयंघोषणापत्र ( Self decleration ) घेतले जाणार असून शेतकऱ्यांनी केलेली ई-पीक पाहणी स्वयंप्रमाणित मानण्यात येऊन ती गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिंबित होणार आहे.
शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणीपैकी १० % नोंदीची पडताळणी ( Crop verification )तलाठ्यांमार्फत करण्यात येणार असून तलाठी हे पडताळणी अंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्या नोंदी सत्यापित करतील. तलाठी यांच्यामार्फत तपासणी केल्यानंतर त्या गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिंबित होतील.
ई-पीक पाहणी दुरुस्त
शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अप्लिकेशन केलेली पीक पाहणी E peek Pahani 2022 ४८ तासामध्ये स्वतःहून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येईल.
किमान आधारभूत योजनेअंतर्गत ( MSP hamibhav yojana ) येणाऱ्या पिकांची ई-पीक पाहणीसाठी नोंदणी केल्यास अशा शेतकऱ्यांची माहिती वेब आज्ञावलीद्वारे पुरवठा विभागाला दिली जाणार असून त्याआधारे पुरवठा विभागाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत ( Hamibhav kharedi ) अशा शेतकऱ्यांची नोंदणी आपोआप होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही.
या पूर्वीच्या मोबाईल अॅपमध्ये ( E pik pahani old application )असलेल्या मुख्य पीक ( Main Crop ) व दोन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधे ऐवजी तीन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर दुय्यम पिकांचा लागवडीचा दिनांक ( Pik pera date ) , हंगाम व क्षेत्र नोंदविण्याची सुविधादेखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुय्यम पिकांची अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमध्येच त्या गावातील खातेदारांनी नोंदविलेल्या पीक पाहणीची माहिती पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याद्वारे खातेदारांना पीक पाहणीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास वेळेत तलाठी कार्यालयाकडे अर्ज करणे शक्य होणार आहे.
वापरकर्त्याला ई-पीक पाहणी मोबाईल अॅप वापरताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी अॅपमध्ये ‘मदत’ ( E peek pahani Helpdesk ) हे बटन देण्यात आलेले आहे. या बटणावर क्लिक केल्यावर नेहमी विचारले जाणारे प्रश्न ( E peek pahani FAQ )व त्यांची उत्तरे देण्यात आलेली आहेत. याचा वापर करून शेतकरी अॅप वापरताना येणाऱ्या अडचणी सोडवू शकतील.
प्रत्येक खातेदाराने आपला पीक पेरा या ई-पीक पाहणी अॅपद्वारे नोंदविणे गरजेचे आहे कारण ई-पीक पाहणीच्या नोंदी या पीक विमा ( pikvima – Crop insurance ) , व पीक विमा दावे ( Crop insurance claim ) निकाली काढण्यासाठी, पीक कर्ज वाटप ( Crop loan ) , नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्यप्रकारे मदत करणे इत्यादी बाबींसाठी आवश्यक असणार आहेत.
खरीप हंगाम २०२२ चे पीक पाहणींची कार्यवाही १ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होत आहे. यासाठी वर नमूद केल्याप्रमाणे सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल अॅप E pik Pahani New Version व्हर्जन-२ गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी सुधारित मोबाईल अॅप E pik Pahani New Version आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून खरीप हंगामातील पीक पाहणी विहित वेळेत पूर्ण केल्यास त्यांच्यासाठी ते उपयुक्त ठरू शकेल.
Palghar : पालघर जिल्ह्याला साथीच्या आजारांचा विळखा; ७० हजारांहून अधिक रुग्णाची तपासणी
पालघर : सध्या पालघर जिल्ह्याला सर्दी, ताप, खोकला, डेंगू सर्दी, पडसे आदी साथीच्या आजाराने (Infection Diseases Reported in Palghar District) विळखा घातल्याचे चित्र दिसत आहे. अचानक झालेल्या हवामान बदल यासह तापमान बदल यामुळे साथ रोग झपाट्याने वाढू लागले आहेत, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे. सरकारी व खाजगी रुग्णालयात सध्या साथीच्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात तापाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते आहे. सुमारे ७० हजारांहून अधिक रुग्णाची तपासणी (Examination of more than 70 thousand patients) केली असता, त्यात बहुतांश रुग्ण हे सर्दी, खोकला, ताप, पडसे, आदी साथ रोगाचे आहेत. पालघर जिल्ह्यातील पाणी साठवणूक होणाऱ्या ग्रामीण व सागरी किनारपट्टी भागात तसेच शहराच्या काही ठराविक भागांत डासजन्य आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. डेंगू, मलेरिया, स्वाईन फ्लू, चिकनगुनिया, अशा तापजन गंभीर आजाराबरोबर लेप्टोस्पायरोसिस सारखे रुग्णही पावसाळ्यात दरम्यान आढळून येत आहेत. मलेरिया रुग्णाची संख्या कमी असली तरी डासांच्या प्रादुर्भावामुळे तो वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
अलीकडेच तलासरी तालुक्यात आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसह ते इतर परिसरातही स्वाइन फ्लूचे जवळपास 30 रुग्ण आढळून आले होते. मात्र योग्य उपचारामुळे ते वेळीच बरे झाले. साथीजन्य आजारांबरोबर इतर गंभीर तापजन्य आजार पुढे आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून आरोग्य विभाग सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहे. तसेच वारंवार तपासण्या करणे, कोरडा दिवस पाळणे, औषधोपचार नियमित घेणे, जोखमीच्या व्यक्तींना देखरेखीखाली ठेवणे, यासह इतर उपाययोजना आरोग्य विभागामार्फत सुरू आहेत. नागरिकांनी स्वतःची नैतिक जबाबदारी म्हणून काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.साथरोगासाठी जिल्ह्यात आवश्यक पुरेल इतका औषधसाठा उपलब्ध असल्याचे, आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. सध्या आरोग्य विभागाकडून संशयित नागरिकाची आरोग्य तपासणी करून, प्रतिबंधात्मक उपाय योजनेचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. साथीचेरोग असलेले रुग्ण याची तपासणी व त्यातून निदान केले जात आहे. साथ रोगाला आळा घालण्यासाठी पालघर नगरपालिका प्रशासनाकडून कीटकनाशक फवारणी, धूर करणे, पिण्याच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकने, आदी उपायोजना करण्यात येत आहेत.
सध्या साथीचारोग वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, तापमान व हवामान बदलाचा परिणाम आहे. या दरम्यान संसर्गातून साथ रोग होतो. मात्र त्यामुळे भीतीचे कोणतेही कारण नाही. साथीचारोग सामान्य प्रकारचा व लवकर बरा होणारा आजार आहे, असे आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे. पालघर जिल्ह्यातील साथरोग रुग्ण संख्या वाढीबद्दल जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सागर पाटील यांना विचारणा केली असता, सध्या साथरोग रुग्ण वाढत असले तरी; सामान्य उपचारामुळे ते बरे होत आहेत. त्यात भीतीचे कारण नाही. डासजन्य आजारासाठी आरोग्य विभाग, योग्य त्या उपाययोजना करत आहे. नागरिकांची तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांची तितकीच जबाबदारी आहे. त्यांनीही खबरदारी घेणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान सध्या पालघर जिल्ह्याला सर्दी ताप, खोकला, मलेरिया, डेंगू चिकन, गुनिया, आदी साथीच्या रोगाच्या आजाराने विळखा घातल्याचे चित्र दिसत आहे. यासाठी आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
डेंग्यूचा रुग्णांचा तक्ता (२०२२)
महिना - रक्त तपासणी - पॉझिटिव्ह रुग्ण
जानेवारी - २३ -३
फेब्रुवारी - ५१ - ८
मार्च - ११९ - ९
एप्रिल - ११३ - ५
मे - ११६ - ९
जून - ९८ - १४
जुलै - १३१ - ९
एकूण - ६५१ - ५७
--------/--------------------------
चिकनगुनिया रुग्णांचा तक्ता (२०२२)
महिना - रक्त तपासणी - पॉझिटिव्ह रुग्ण
मार्च - ७ - ६
एप्रिल - ११ - ४
जुलै - ७ - १
एकूण - २७ - ११
-------------–------------------
लेप्टोस्पायरोसिस रुग्णांचा तक्ता (२०२२)
महिना - रक्त तपासणी - पॉझिटिव्ह रुग्ण
जानेवारी - ५ - १
फेब्रुवारी - ५ - २
मे - ३ -१
एकूण - १५ - ४
----------------------/-------
मलेरिया रुग्ण
ग्रामीण
रुग्ण रक्त तपासणी - १९२२७२
पॉझिटिव्ह - ८
मनपा व न.प
रुग्ण रक्त तपासणी - ७८५९४
पॉझिटिव्ह - ३३
तीन महिन्यात 144964 रुग्णांनी केली तपासणी : उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात गेल्या तीन महिन्यात बाह्य रुग्ण तपासणी करणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील बारा आरोग्य संस्थांमधून 41,746 रुग्णांनी तपासणी केली. मे मध्ये हा आकडा सुमारे पाच हजार रुग्णांनी वाढला. मे महिन्यात 46,118 रुग्णांनी बाह्यरुग्ण सामान्य तपासणी केल्या आहेत. तर जून मध्ये या आकड्यांमध्ये जवळपास नऊ हजार रुग्णांची भर पडली. जूनमध्ये 57 हजार 70 रुग्णांनी बाह्य रुग्ण विभागात आपली सामान्य तपासणी केली आहे.