Saturday, December 3, 2022

महारेशीम अभियान 2023

महारेशीम अभियान 2023: शेतकऱ्यांना संपर्क करण्याचे आवाहन

Mahareshim abhiyan 2023





राज्यात महारेशीम अभियान 2023 राबविण्यात येत असून या अंतर्गत नवीन तुती क्षेत्र नोंदणीचा कार्यक्रम 15 डिसेंबरपर्यंत असणार आहे. 

इच्छुक शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तुती लागवडीव्दारे रेशीम कोष उत्पादन योजना राबविण्यात येत आहे. 



यात लाभार्थी निवडताना 

१) अनुसुचित जाती
२) अनुसुचित जमाती
३) विमुक्त जमाती
४) दारिद्रय रेषेखालील कुटुंबे
५) शारीरिक अपंगत्व प्रधान कुटुंबे
६) भूसुधार योजनेचे लाभार्थी
७) कृषी कर्ज माफी योजनेनुसार अल्प भूधारक सीमांत शेतकऱ्यांना निवडण्यात येणार आहे. 



या योजनेअंतर्गत रेशीम विकास प्रकल्पासाठी तीन वर्षामध्ये अकुशल व कुशल मजुरी देण्यात येते. 

यात तुती लागवड व जोपासनेसाठी 682 मनुष्य दिवस व किटक संगोपन गृहासाठी 213 दिवस असे एकूण 895 दिवसांची मजुरी देण्यात येते. 
स्वत: मजुर म्हणून स्वत:च्या शेतात काम करणे आवश्यक आहे.


लाभार्थी निवडताना इच्छुक लाभार्थ्यांकडे मध्यम ते भारी व पाण्याची निचरा होणारी जमीन असावी. 

नवीन तुती लागवड क्षेत्रासाठी सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध असणे आवश्यक आहे. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आठमाही सिंचनाची सोय व खर्च करण्याची तयारी असलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय, येथे संपर्क साधावा,

सर्व खर्च वजा जाता एकरी वार्षिक किमान दिड लाख रुपये उत्पन्न निश्चित मिळेल. जिल्ह्यात रेशीम शेती उद्योगासाठी वाव आहे.



Thursday, December 1, 2022

(Maharashtra Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022 [मुदतवाढ]

(Maharashtra Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022 [मुदतवाढ]

Total: 18331 जागा 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1पोलीस शिपाई14956
2चालक पोलीस शिपाई चालक2174
3राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF)1201
Total18331

युनिट नुसार रिक्त जागा:

अ. क्रयुनिटपद संख्या 
पोलीस शिपाईचालक पोलीस शिपाई चालक
1बृहन्मुंबई7076994
2ठाणे शहर52175
3पुणे शहर72010
4पिंपरी चिंचवड216—
5मिरा भाईंदर986—
6नागपूर शहर308121
7नवी मुंबई204
8अमरावती शहर2021
9सोलापूर शहर9873
10लोहमार्ग मुंबई620—
11ठाणे ग्रामीण6848
12रायगड27206
13पालघर21105
14सिंधुदुर्ग9922
15रत्नागिरी131—
16नाशिक ग्रामीण16415
17अहमदनगर12910
18धुळे42—
19कोल्हापूर24—
20पुणे ग्रामीण57990
21सातारा145—
22सोलापूर ग्रामीण2628
23औरंगाबाद ग्रामीण39—
24नांदेड15530
25परभणी75—
26हिंगोली21—
27नागपूर ग्रामीण13247
28भंडारा6156
29चंद्रपूर19481
30वर्धा9036
31गडचिरोली348160
32गोंदिया17222
33अमरावती ग्रामीण15641
34अकोला32739
35बुलढाणा51—
36यवतमाळ24458
37लोहमार्ग पुणे124—
38लोहमार्ग औरंगाबाद108—
39औरंगाबाद शहर—15
40लातूर—29
41वाशिम—14
42लोहमार्ग नागपूर—28
राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF)
1पुणे SRPF 1119
2पुणे SRPF 246
3नागपूर SRPF 454
4दौंड SRPF 571
5धुळे SRPF 659
6दौंड SRPF 7110
7मुंबई SRPF 875
8सोलापूर  SRPF 1033
9गोंदिया SRPF 1540
10कोल्हापूर SRPF 1673
11काटोल नागपूर SRPF 18243
12कुसडगाव अहमदनगर SRPF 19278


शैक्षणिक पात्रता:

  1. पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
  2. पोलीस शिपाई चालक: (i) इयत्ता 12वी उत्तीर्ण.  (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV-TR)
  3. राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.


शारीरिक पात्रता: 

उंची/छाती पुरुषमहिला
उंची165 सेमी पेक्षा कमी नसावी (SRPF: 168 सेमी)158 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती  न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी—

शारीरिक चाचणी: 

क्रिया पुरुष महिला गुण
पोलीस शिपाई
धावणी1600 मीटर800 मीटर20
100 मीटर100 मीटर15
गोळा फेक——15
Total50 गुण
पोलीस शिपाई चालक
धावणी1600 मीटर800 मीटर30
गोळा फेक——20
Total50 गुण
पोलीस शिपाई SRPF
धावणी05 कि.मी—50
100 मीटर—25
गोळा फेक——25
Total100 गुण

वयाची अट: 30 नोव्हेंबर 2022रोजी,  [मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट]

  1. पोलीस शिपाई: 18 ते 28 वर्षे.
  2. चालक पोलीस शिपाई: 19 ते 28 वर्षे.
  3. राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: 18 ते 25 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹450/-    [मागास प्रवर्ग: ₹350/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2022  15 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

उमेदवारांना सामान्य सूचना: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

English Post Divider

Total: 18331 Posts

Name of the Post & Details: 

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Police Constable14956
2Police Constable Driver2174
3SRPF Armed Police Constable1201
Total18331

Educational Qualification: 

  1. Constable Driver: 12th passed from recognized Board.
  2. Police Constable Driver: (i) 12th passed from recognized Board.  (ii) LMV-TR
  3. SRPF Armed Police Constable: 12th passed from recognized Board.

Age Limit: as on 30 November 2022,  [Reserved Category: 05 years Relaxation]

  1. Constable Driver: 18 to 28 years
  2. Police Constable Driver: 19 to 28 years
  3. SRPF Armed Police Constable: 18 to 25

Friday, November 25, 2022

महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना

महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना

महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे तसेच शिक्षण शुल्का अभावी त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी शासनाकडून निरंतर प्रयत्न केले जातात. या उद्देशापोटी शासनातर्फे 2006-07 या शैक्षणिक वर्षापासून शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कृषी विभाग ,वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांच्या अधिकाराखाली येणाऱ्या मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती करण्यासाठी निर्णय घेण्यात आला.

सदर योजना ही दिनांक 31 मार्च 2016 पासून अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती करण्यास शासनातर्फे मुदतवाढ देण्यात आली.

शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना

योजना अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले अभ्यासक्रम

  • आरोग्य विज्ञान पदवी (DEGREE) अभ्यासक्रमा अंतर्गत : वैद्यकीय, दंत, होमिओपॅथी, युनानी, आयुर्वेद, भौतिकोपचार, व्यवसायोपचार व नर्सिंग अभ्यासक्रम.
  • उच्च व तंत्रशिक्षण अभ्यासक्रम :
पदविका (Diploma)अभियांत्रिकी (Engineering), औषध निर्माण(Pharmacy), एच.एम.सी.टी. (Hotel Management)
पदवी (Degree/Graduation)अभियांत्रिकी (Engineering), औषध निर्माण(Pharmacy), एच.एम.सी.टी. (Hotel Management) , वास्तुशास्त्र.
पदव्युत्तर पदवी (Post Graduation) एम.बी.ए. / एम.एम.एस. , एम.सी.ए.

  • कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय अभ्यासक्रमांतर्गत शासकीय कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती खालील अभ्यासक्रमांसाठी लागू राहील.

कृषी विद्यालय – पदविका (Diploma)

दुग्धव्यवसाय विकास – पदविका (Diploma)

कृषी व संलग्न विषयांची महाविद्यालये – पदवी व पदव्युत्तर(Graduation / Post Graduation)

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालये – पदवी व पदव्युत्तर

कृषी अन्नतंत्रज्ञान महाविद्यालये – पदवी व पदव्युत्तर

  • बी.एड. व डी.एड. अभ्यासक्रम

योजनेअंतर्गत पात्रता, अटी व शर्ती

  • विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे (दोन्ही पालकांचे एकत्र) उत्पन्न 4.50 लाखाच्या वर नसावे.प्रथम वर्ष योजनेचा लाभ घेतल्यास ही सवलत अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सुरू राहील.
  • राज्यातील मान्यताप्राप्त विनाअनुदानित व कायम अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये व्यवसायिक शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क ची 100% प्रतिपूर्ती तसेच इतर मागास वर्गांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क ची 50% प्रतिपूर्ती करण्यात येईल.
  • योजनेचा लाभ फक्त शासकीय कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच लागू राहील.
  • आरक्षणाचा लाभ न घेता खुल्या जागांवर प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.
  • तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत अभ्यासक्रमासाठी ज्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या सेन्ट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसिजर(CAP)द्वारे प्रवेश घेतला असेल त्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
  • AIEEE कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.
  • जर एखादा विद्यार्थी कुठल्याही अन्य योजनेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती अथवा शुल्क प्रतिपूर्ती चा लाभ घेत असेल तो विद्यार्थी या योजनेकरिता पात्र असणार नाही.
  • विद्यार्थ्यांची महाविद्यालयात / कॉलेजमध्ये वर्गात उपस्थिती अनिवार्य आहे तसेच प्रत्येक सत्राची (सेमिस्टर) किंवा वार्षिक परीक्षा देणे आवश्यक आहे.
  • पात्र विद्यार्थ्याने एखाद्या सत्राची (सेमिस्टर) परीक्षा दिली नसल्यास किंवा एखाद्या शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्या वर्षासाठी प्रवेश मिळाला नसल्यास पुढील वर्षाकरिता या योजनेअंतर्गत सदर विद्यार्थी तो पात्र असणार नाही. परंतु त्यानंतर जर परत तो विद्यार्थी सत्र परीक्षा किंवा किंवा वार्षिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर किंवा अंशतः पास (ATKT) झाला असल्यास त्या अभ्यासक्रमाच्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश मिळाल्यास सदर योजनेतील लाभासाठी पात्र असेल.
  • जो विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या एकूण कालावधीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळी पूर्णपणे अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्या अभ्यासक्रमाच्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश मिळाला नसेल तर संबंधित विद्यार्थी त्या अभ्यासक्रमाच्या उर्वरित कालावधी साठी योजनेअंतर्गत कायमस्वरुपी अपात्र ठरविण्यात येईल.

लागणारी महत्त्वाची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी प्रवेश घेताना पालकांचा (दोन्ही पालकांचे  एकत्र) उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांच्याकडून घ्यावा लागेल.
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate).
  • अनुसूचित जाती, विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सक्षम अधिकाऱ्याकडून मिळालेला जातीचा दाखला.

योजनेंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया 

योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी लाभार्थी विद्यार्थ्याला वरील लागणारी संपूर्ण महत्वाची कागदपत्रे तो शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयात / कॉलेज अथवा संस्थेमध्ये जमा करावे लागतील. विद्यार्थ्यांचा अर्ज हा संस्थेमार्फत / महाविद्यालयांमार्फतच शासनाकडे मंजुरी साठी पाठविण्यात येतो.

योजनेबद्दल सविस्तर माहिती हवी असल्यास इथे क्लिक करा

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना


Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील रहिवाशांसाठी राबविण्यात येणारी एक आरोग्य विमा योजना आहे. राज्यात यापूर्वी सुरू असलेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेला विराम देऊन आणि  त्यात आवश्यक ते सुधार करून नव्या रीतीने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना दिनांक 2 ऑक्टोबर 2016 पासून राबविण्यात आली. या योजनेद्वारे राज्यातील नागरिकांना शाश्वत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे धोरण आहे.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनाशी संलग्न करून दोन्ही योजना दिनांक 01 एप्रिल 2020 पासून राज्यात राबविण्यात येत आहेत. या योजने अंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष रुपये 150000/-( दीड लाख ) पर्यंत मेडिकल व सर्जिकल उपचार तसेच किडनी प्रत्यारोपणासाठी रुपये 250000/- (अडीच लाख ) पर्यंत उपचाराचा लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष रुपये 500000/- ( पाच लक्ष ) पर्यंत उपचाराचा लाभ मिळेल.  या लेखाद्वारे आम्ही आपणास या योजने बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत जसे की योजनेचे उद्देश, लाभ घेण्यास पात्र लाभार्थी, लागणारी महत्त्वाची कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, रुग्णालयांची यादी आणि समाविष्ट केलेले आजार इत्यादी.


Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx
MJPJAY logo

योजनेचे उद्दिष्ट

एकत्रित ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत राज्यातील दारिद्र्य रेषेखालील तसेच दारिद्र्य रेषेवरील कुटुंबांना विविध गंभीर आजारांवर मोफत उपचार प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केलेली आहे. राज्यातील जास्तीत जास्त रुग्णालयांचा समावेश या योजनेत करून अधिकतर रुग्णांना जवळच्याच रूग्णालयात उपचार मिळावा हे शासनाचे उद्देश्य आहे. त्याकरिता शासनाने शासकीय रुग्णालयां सोबतच खाजगी रुग्णालयांचाही यामध्ये समावेश केलेला आहे. कोविंड-19 तसेच म्युकरमायकोसीस या साथ रोगाच्या आजारावरील उपचारही या योजनेअंतर्गत समाविष्ट करून राज्यातील सर्व नागरिकांना  याचा लाभ घेता यावा आणि उपचाराचा आर्थिक भार नागरिकांवर पडू नये हे शासनाचे उद्देश्य आहे.


Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx

लाभ घेण्यास पात्र लाभार्थी

  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे ज्यांच्याकडे पिवळ्या रंगाची शिधापत्रिका ( रेशन कार्ड ) आहे.
  • दारिद्र्य रेषेवरील कुटुंबे ज्यांच्याकडे केशरी रंगाची शिधापत्रिका ( रेशन कार्ड ) आहे.
  • अन्नपूर्णा योजना तसेच अंत्योदया अन्न योजना शिधापत्रिका धारक कुटुंबे.
  • बांधकाम कर्मचारी व त्यांची कुटुंबे.
  • औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा असे एकूण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका असणारे शेतकऱ्यांची कुटुंबे.
  • शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी.
  • महिला आश्रमातील महिला.
  • वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक.
  • अनाथालयातील मुले.
Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx

लागणारी महत्त्वाची कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो.
  • आधार कार्ड.
  • पत्त्याचा पुरावा.
  • शिधापत्रिका (राशन कार्ड).
  • विभागाने दिलेले ओळखपत्र.
  • उत्पन्नाचा दाखला.
  • शासकीय किंवा खाजगी डॉक्टर कडून रोग निदान प्रमाणपत्र.

योजनेअंतर्गत महत्त्वाच्या बाबी

  • या योजनेअंतर्गत शासकीय तथा खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या  एकुण 973 रुग्णालयांचा समावेश करण्यात आलेला आहे.
  • ही योजना पूर्णपणे रोकड विरहित ( Cashless ) आहे.
  • आरोग्यमित्र : योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या रूग्णालयात शासनातर्फे आरोग्य मित्राची नेमणूक करण्यात येईल. आरोग्य मित्र हे रुग्णांचे वेळोवेळी मार्गदर्शन करतील. रुग्णांकडे असलेल्या रेशन कार्डच्या मदतीने रुग्णांची नोंद करण्याची जबाबदारी आरोग्य मित्रावर असेल. रुग्णालयाला नियमितपणे भेट देणे आणि रुग्णाला योजनेचा सर्व लाभ मिळत असल्याचे सुनिश्चित करणे ही जबाबदारी आरोग्य मित्राची राहील. रूग्णालयात दाखला मिळाल्यापासून तर रुग्ण घरी जाईपर्यंत आरोग्यमित्र हे रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांना संपूर्ण सहकार्य करतील.
  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत 1100 पद्धतींचे रोग उपचार आणि शस्त्रक्रिया समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.
  • या 1100 पद्धतीमधील 111 उपचार पद्धती / शस्त्रक्रिया पद्धती शासकीय रुग्णालय यांच्यासाठी राखीव असतील.
  • या 1100 रोग उपचार शस्त्रक्रिया पद्धतीमधील 127 पाठपुरावा सेवा देखील (सर्जिकल आणि मेडिकल) रुग्णालयात मार्फत देण्यात येतील.
  • योजनेत समाविष्ट रुग्णालयांनी उपचारास नकार दिला किंवा हलक्या दर्जाच्या सेवा पुरवल्या तर त्याबाबत शासनाकडून त्या रुग्णालयावर पॅकेज रकमेच्या पाचपट दंड आकारण्याची तरतूद शासनाने केलेली आहे.
Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx

योजनेअंतर्गत देण्यात येणारे उपचार

  • सर्वसाधारण शस्त्रक्रिया
  • हृदय शस्त्रक्रिया व उपचार
  • बालरोग शस्त्रक्रिया व उपचार
  • स्त्रीरोग शस्त्रक्रिया
  • नेत्र शस्त्रक्रिया
  • हाडांची शस्त्रक्रिया
  • मेंदू व मज्जासंस्था यांच्यावरील शस्त्रक्रिया व उपचार
  • प्लास्टिक सर्जरी
  • जळालेल्या रुग्णांवरील उपचार
  • जठर व आतडे यांच्या शस्त्रक्रिया व उपचार
  • कृत्रिम अवयव
  • त्वचेच्या, सांध्याच्या व फुफ्फुसाच्या आजारावरील उपचार
  • एंडोक्राइन
  • लहान मुलांचे कर्करोग
  • मानसिक आजार इत्यादी
Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx

योजनेचा लाभ घेण्याची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

या योजनेअंतर्गत रुग्णांची ऑनलाईन नोंदणीची जबाबदारी आरोग्य मित्रांची असेल. योजनेअंतर्गत समावेश करण्यात आलेल्या सर्व रूग्णालयात आरोग्यमित्र उपलब्ध असतील. रुग्णाच्या नोंदणी प्रसंगी रुग्णाला ओळखपत्र म्हणून खालील पैकी कुठलेही एक कागदपत्र द्यावे लागेल. तसेच रुग्णाकडे असलेली वैध शिधापत्रिका / राशन कार्ड सोबत द्यावी  लागेल.

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स  
  • मतदान कार्ड
  • नॅशनलाईज बँक पासबुक फोटोसह
  • अपंग असल्याचे प्रमाणपत्र
  •  शाळा / कॉलेज ओळखपत्र
  • वरिष्ठ नागरिक कार्ड
  • स्वतंत्र सेनानी ओळखपत्र
  • माजी सैनिक कार्ड
  • राजीव गांधी जन आरोग्य योजना कार्ड
  • वरीलपैकी कुठलेही ओळखपत्र नसल्यास तहसीलदार यांचे प्रमाणपत्र स्वीकृत करण्यात येईल.
Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx

योजनेअंतर्गत उपचार पूर्व मान्यता मिळण्याची पद्धत

सर्वप्रथम आपण दिलेल्या कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी केली जाईल  पडताळणी यशस्वी झाल्यास उपचाराला मान्यता देण्यात येईल. मान्यता नाकारण्यात आलेले अर्ज हे तांत्रिक समितीकडे पाठविले जाईल. तांत्रिक समिती मध्ये विमा कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी व राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य वैद्यकीय सल्लागार निर्णय देतात. जर त्यांच्या निर्णयांमध्ये तफावत असेल असे अर्ज अंतिम मान्यतेसाठी राज्य आरोग्य हमी सोसायटी चे सहाय्यक संचालक यांच्याकडे पाठविण्यात येतात.

Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx

योजनेअंतर्गत रुग्णालयांची यादी शोधण्याची पद्धत

सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकारीक संकेतस्थळावर (वेबसाईट वर) जावे लागेल.

वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे खालील  होम पेज / मुख्यपृष्ठ उघडेल.

 

या पेजवर वरील उजव्या बाजूला मराठी / English भाषेची निवड तुम्हाला करता येईल . मराठी भाषेची निवड केल्यानंतर तुमच्या पुढे खालील पेज उघडेल

या पेज वर तुम्हाला “अंगीकृत रुग्णालये” वर क्लिक करून तुमच्या उपचारा संबंधित, आजार संबंधित किंवा तुमच्या जिल्हयात उपलब्ध रुग्णालयांची यादी बघता येईल.

Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx


एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत पॅकेज आधारित आजार आणि त्याला लागणाऱ्या खर्चाचे PDF डाउनलोड करण्याची पद्धत 

सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकारीक संकेतस्थळावर (वेबसाईट वर) जावे लागेल.

मराठी भाषेची निवड केल्यानंतर तुम्हाला “Operational Guidelines” वर जाऊन खाली आलेल्या “Package Costs” वर क्लिक करून फाईल डाउनलोड करता येईल किंवा खाली तीच फाईल आम्ही तुम्हाला PDF च्या रूपात देत आहोत तिथे ही तुम्ही बघू अथवा डाउनलोड करू शकता.

 


Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना

कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध सिंचन योजना राबवल्या जातात. अशीच एक सिंचन योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे तिचं नाव “मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना” असे आहे. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना संबंधित सर्व महत्त्वाची माहिती देणार आहोत जसे की या योजनेचे फायदे, उद्देश, पात्रता, वैशिष्ट्ये, महत्त्वाची कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया इत्यादी.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना उद्देश

महाराष्ट्र शासनाने 19 ऑगस्ट 2019 रोजी कोरडवाहू शेती अभियानाअंतर्गत अवर्षण प्रवण क्षेत्रातील (Rainfed Area/दुष्काळग्रस्त भाग) शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, कोरडवाहू शेती अभियानामध्ये बदल करून “मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना” अवर्षण प्रवण क्षेत्राबरोबरच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला होता. या योजने नुसार अवर्षणप्रवण घोषित 149 तालुके तसेच अमरावती व औरंगाबाद महसूल विभागातील सर्व व नागपूर विभागातील वर्धा या 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये आणि केंद्र शासनाने नक्षलग्रस्त म्हणून घोषित केलेल्या चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर सदर योजना सन 2021-22 पासून राज्यातील उर्वरित 107 तालुक्यांमध्ये देखील राबवण्याचा निर्णय शासनाद्वारे 18 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात आला. आता ही योजना महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांत राबवण्यात येत आहे.


प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना (पाच हेक्टर पर्यंत) 45 टक्के अनुदान देण्यात येते. या अनुदानाच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान उपलब्ध करून सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे 80 टक्के व 75 टक्के एकूण अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.

drip irrigation


मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत दिलेले लाभ आणि आर्थिक मदत

अनु. क्रकुठल्या कामाकरिताअनुदान रक्कम 
1सूक्ष्म सिंचन :
i)ठिबक सिंचन
ii)तुषार सिंचन
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना देय 55% अनुदानास पूरक अनुदान 25% देऊन 80 टक्के अनुदान देण्यासाठी व इतर शेतकऱ्यांना (पाच हेक्टर पर्यंत) देय 40% अनुदानास 30% पूरक अनुदान देऊन एकूण 75 टक्के अनुदान देण्यासाठी आवश्यक निधीच्या मर्यादेत.
2वैयक्तिक शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरणएकूण प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 75000 यापैकी जे कमी असेल ते.
3हरित गृह उभारणे (1000 चौरस मीटर क्षेत्र मर्यादा) रू. 100000/- (एक लाख रुपये) 

4शेडनेट हाऊस उभारणे
(1000 चौरस मीटर क्षेत्र मर्यादा)


 रू. 100000/- (एक लाख रुपये)


अर्जदार शेतकऱ्यांना वरीलपैकी सर्व बाबींचा किंवा त्यांना आवश्यक असेल तेवढ्या बाबींकरिता लाभ घेता येईल. सदर योजनेअंतर्गत विविध बाबींकरिता वरील नमूद केलेले अनुदान हे कमाल स्वरूपात असून संबंधित बाबी करिता केंद्र शासनाने सुचवलेल्या मापदंडानुसार प्रत्यक्षात येणारा खर्च किंवा वरील उच्चतम अनुदान मर्यादेची रक्कम यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढ्या रकमेच्या अनुदानास अर्जदार शेतकरी पात्र राहतील.

तुषार सिंचन

योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता

  • अर्जदार शेतकऱ्याच्या नावे जमिनीचा 7/12 व 8-अ उतारा असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने अर्जासोबत ज्या जमिनीचा उतारा किंवा दाखला दिला असेल त्याच जमिनीवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
  • अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांनी जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याचे बँक खाते असणे व हे बँक खाते आधार कार्ड सोबत संलग्न असणे गरजेचे आहे.
  •  या योजने अंतर्गत सर्व घटकांसाठी कमाल शेत जमीन मर्यादा 5.00 हेक्टर एवढी राहील.

लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्डची झेरॉक्स प्रत.
  • 7/12 उतारा.
  • 8-अ उतारा.
  • अर्जदाराने नुकतेच काढलेले छायाचित्र.
  • आधार संलग्न असलेल्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत.
  • अनुसूचित जाती/जमातीच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत जात प्रमाणपत्र.
  • लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.
  • सामाईक एकूण धारणा क्षेत्र बाबतचा तलाठी यांचेकडील दाखला.
  • शेततळे अस्तरीकरण पुर्णत्वाबाबतचे हमीपत्र.
  • काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह)
  • अधिकृत विक्रेत्याकडून सूक्ष्म सिंचन संच / पंपसंच खरेदी केल्यानंतर त्याबाबतचे देयक (Bill/ Invoice) जोडावे लागेल.

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया

सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर ( वेबसाईट ) जावे  लागेल. तुमच्या पुढे खालील पेज ओपन होईल.

 जर तुम्ही नवीन अर्जदार असाल तर तुम्हाला आधी “ नवीन अर्जदार नोंदणी “ यावर क्लिक करावे लागेल.  “ नवीन अर्जदार नोंदणी “ यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे खालील पेज ओपन होईल.

  • वरील पेज वर तुम्हाला अर्जदाराचे नाव भरावे लागेल. त्यानंतर वापरकर्त्याचे नाव (लॉगिन आयडी) आणि पासवर्ड दिलेल्या सूचना नुसार प्रविष्ट करावा लागेल.
  • त्यानंतर जर तुमचा ईमेल आयडी असेल तर तो प्रविष्ट करून “ईमेल आयडी ची सत्यता तपासणीकरिता ओटीपी मिळवा” वर क्लिक करावे लागेल आणि तुमच्या ईमेल आयडी वर आलेला ओटीपी प्रविष्ट करून “ओटीपी तपासा” वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून “मोबाइल क्रमांकाची सत्यता तपासणीकरिता ओटीपी मिळवा” वर क्लिक करावे लागेल आणि तुमच्या मोबाईल वर आलेला ओटीपी प्रविष्ट करून “ओटीपी तपासा” वर क्लिक करावे लागेल.
  •  त्यानंतर प्रतिमेत दर्शविलेले शब्द (captcha) प्रविष्ट करून “नोंदणी करा” वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ओके वर क्लिक करून पुढे जावे लागेल.
  • आता खालील पेजवर तुम्ही लॉगिन चा प्रकार निवडून लॉगिन करू शकाल.
  • वापरकर्ता आयडी मध्ये तुम्हाला जो तुम्ही वरील प्रमाणे लॉगिन आयडी आणि पासवर्ड सेट केलेला आहे तो प्रविष्ट करून लॉगिन करता येईल.
  • किंवा आधार क्रमांक प्रविष्ट करून सुद्धा तुम्ही लॉगिन करू शकाल. आधार क्रमांक प्रविष्ट केल्यावर ओटीपी वर क्लिक केल्यानंतर “ओटीपी पाठवा” वर क्लिक करावे लागेल. हा ओटीपी तुमच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येईल तो प्रविष्ट करून “ओटीपी तपासा” वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे प्रोफाइल (वैयक्तिक माहिती) संपूर्णपणे भरावी लागेल. सर्व * चिन्हांकित माहिती भरणे अनिवार्य राहील जसे संपूर्ण नाव, जातीचा तपशील, आधार संलग्न बँक खात्याची माहिती, कायमचा पत्ता, पत्रव्यवहाराचा पत्ता, शेत जमिनीचा तपशील इत्यादी माहिती भरून आपण आपले प्रोफाईल स्थिती 100% पूर्ण करणे गरजेचे आहे.
  • त्यानंतर आपल्याला ठिबक / तुषार सिंचनाचा उपयोग ज्या पिकांसाठी करावयाचा आहे त्या “पिकांचा तपशील सादर करा” यावर क्लिक करुन पिकांचा संपूर्ण तपशील भरावा लागेल.
  • त्यानंतर “मुख्यपृष्ठ” वर क्लिक केल्यावर आपल्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल. त्या पेजवर “अर्ज करा” वर आपल्याला क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर सिंचन साधने व सुविधा या घटकांतर्गत तुम्हाला सदर योजना निवडून त्यावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर बाबी निवडा वर क्लिक करून ओपन झालेल्या पेजवर संपूर्ण माहिती भरून “जतन करा” यावर क्लिक करावे लागेल.
  • नंतर “मेन्यूवर जा” यावर क्लिक करून “अर्ज सादर करा” वर क्लिक करावे लागेल’ शेवटी तुम्हाला Make Payment वर क्लिक करून Wallet/Net Banking/Credit-Debit card/ IMPS/UPI यापैकी कुठलाही पर्याय निवडून पेमेंट करावे लागेल.

अशाप्रकारे आपण ठिबक व तुषार सिंचनासाठी सदर योजनेअंतर्गत अर्ज करू शकाल.