Sunday, December 25, 2022
वडिलोपार्जित जमीनीचे वाटप करायचंय? दुय्यम निबंधक कार्यालयात जायची गरज नाही
Friday, December 23, 2022
अर्ज सुरु आहे शेळी गट, दुधाळ जनावर गट, कुक्कुट पक्षी वाटप योजना
शेतकऱ्यांना पूरक व्यवसायासाठी शासन नेहमीच मदत करीत आहे.
वंचितांना अधिक न्याय मिळावा यासाठी दुधाळ जनावरे व शेळी वाटप, कुक्कुट पक्षी वाटप ही योजना राबविली जाते. 2022 दुधाळ जनावरे गट वाटप योजना, शेळी गट वाटप योजना आणि शेळ्या, मेंढ्या आणि कोंबड्यां अशा विविध योजना राबविल्या जात आहेत.
पशुसंवर्धन विभागाच्या विविध नाविन्यपूर्ण वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी दि. ११ जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. याचा लाभ घेण्याकरीता पशुपालक, शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवती व महिलांनी जास्तीत जास्त अर्ज दाखल करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक/शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्ष ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थीची निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे.
आता याबरोबर जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी ही संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे.
यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी सन २०२१-२२ पासून पुढील ५ वर्ष म्हणजे सन २०२५-२६ पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे.
यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामूळे लाभार्थी हिस्सा भरणे किवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.
नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप, शेळी-मेंढी गट वाटप, १००० मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५ + ३ तलंगा गट वाटप अशा विविध योजनांसाठी लाभार्थींची निवड प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सन २०२२-२३ वर्षाकरीता राबविली जाणार आहे.
पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ
https.//ah.mahabms.com अँड्रॉईड मोबाईल अॅप्लिकेशनचे नाव : AH.MAHABMS (Google play स्टोरवरील मोबाईल अॅपवर उपलब्ध )
Wednesday, December 21, 2022
मित्रांनो, असे होते का? होत नसेल तर काय करणार?
Monday, December 19, 2022
कशे करुन घ्यावे वडिलोपार्जित जमिनीचे वाटणी पत्र...
- महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये वाटप जमीन वाटणी
- दुय्यम निबंधकासमोर नोंदणीकृत वाटप
- दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करून वाटप.
वडिलोपार्जित जमिनीचे वाटप फक्त जमिनीच्या सहहिस्सेदारांमध्येच करता येते. इतर कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीच्या नावे वाटप करता येत नाही.
Saturday, December 17, 2022
जननी सुरक्षा योजना
शासन परिपञक क्रमांक जेएसवाय/2006/प्र.क्र.175/ कु.क.3 दि. 22 डिसेंबर 2006 नुसार जननी सुरक्षा योजना राबविली जाते. या योजनेमध्ये ग्रामीण व शहरी भागातील अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व दारिद्रयरेषेखालील लाभार्थ्यांना लाभ दिला जातो.
केंद्रशासनाच्या परिपञकानुसार दिनांक 8 मे 2013 पासून लाभार्थ्यांचे वय व अपत्यासंबंधीच्या अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत.
उद्दिष्टे
राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील, अनुसूचित जाती व अनुसुचित जमातीच्या कुटुंबातील माता मृत्यु व अर्भक मृत्युचे प्रमाण कमी करणे आणि या महिलांचे आरोग्य संस्थेत प्रसुतीचे प्रमाणात वाढ करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
अंमलबजावणी पध्दत
राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील व अनुसुचित जाती व जमाती या कुटुंबातील सर्व गरोदर महिलांना शासकीय व खाजगी मानंकित आरोग्य संस्थेतील कोणत्याही बाळंतपणानंतर लाभ देय आहे तर फक्त दारिद्रयरेषेखालील गरोदर महिलेला घरी बाळंतपणानंतर लाभ देय आहे.
- लाभार्थीकडून जननी सुरक्षा योजनेकरिता आवश्यक असलेली कागदपञे प्राप्त करुन घेणे.
- विहीत नमुन्यातील जेएसवाय कार्ड सर्व आवश्यक माहिती भरुन लाभार्थीस देणे.
- पाञ लाभार्थीस प्रसुतीपूर्व तीन तपासणी, धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण व लोहयुक्त गोळया मिळवून देणे अथवा त्याकरिता मदत करणे.
- पाञ जेएसवाय लाभार्थीस शासकीय आरोग्य संस्थ्ोत किंवा शासन मानांकित खाजगी आरोग्य संस्थेत प्रसुती करिता प्रवृत्त करणे.
- पाञ जेएसवाय लाभार्थीस बॅंकेत खाते उघडून घेण्यासाठी मदत करणे
ग्रामीण भागातील जेएसवाय पाञ लाभार्थी जर शासकीय आरोग्य संस्था / मानांकित खाजगी आरोग्य संस्थ्ोत प्रसुत झाली तर तिला प्रसुतीच्या तारखेनंतर 7 दिवसाच्या आत रुपये 700/- लाभ बॅंक खात्यामध्ये परस्पर जमा होणा़-या धनादेशाव्दारे (Account Payee Crossed Cheque) दिला जातो.
ग्रामीण व शहरी भागातील फक्त दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील लाभार्थ्यांची प्रसुती घरी झाल्यास अशा लाभार्थ्यांस रुपये 500/- लाभ प्रसुतीच्या तारखेनंतर 7 दिवसाच्या आत बॅंक खात्यामध्ये परस्पर जमा होणा़या धनादेशाव्दारे (Account Payee Crossed Cheque) दिला जातो.
जेएसवाय पाञ लाभार्थीची सिझेरियन शस्ञक्रिया करणे आवश्यक असल्यास लाभार्थीस रुपये 1500/- लाभ बॅंक खात्यामध्ये परस्पर जमा होणा़या धनादेशाव्दारे (Account Payee Crossed Cheque) दिला जातो.
आशा कार्यकर्तीस मिळणारे लाभ
ग्रामीण भागातील पाञ जेएसवाय लाभार्थीची प्रसुती शासकीय अथवा खाजगी मानंकित आरोग्य संस्थेत करण्यासाठी लाभार्थीस प्रवृत्त केल्यास एकूण रुपये 600/- प्रती लाभार्थी आशा कार्यकर्तीस मानधन म्हणून अदा करण्यात येते. त्यामधील रुपये 300/- प्रसूती पूर्व दयावयाच्या सेवा दिल्याची खाञी केल्यावर आणि रुपये 300/- आरोग्य संस्थ्ेात प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देण्यात येते.
शहरी भागात पाञ जेएसवाय लाभार्थीची प्रसुती आरोग्य संस्थेत करण्यासाठी लाभार्थीस प्रवृत्त केल्यास एकूण रुपये 400/- प्रती लाभार्थी आशा कार्यकर्तीस मानधन म्हणून अदा करण्यात येते. त्यामधील रुपये 200/- प्रसूती पूर्व दयावयाच्या सेवा दिल्याची खाञी केल्यावर आणि रुपये 200/- आरोग्य संस्थ्ेात प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देण्यात येते.
सेवा देणाऱ्या आरोग्य संस्था ग्रामीण भागात – उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा स्ञी रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, आणि जननी सुरक्षा योजनेकरिता मानांकित केलेली खाजगी रुग्णालये.
शहरी भागात – वैदयकीय महाविदयालये, नगरपालिका व महानगरपालिका यांच्या कार्यक्षेञतील नागरी आरोग्य केंद्रे, नागरी कुटुंब कल्याण केंद्रे व त्यांच्याकडील इतर रुग्णालये आणि शासन अनुदानित रुग्णालये.
बिगर शासकिय संस्थांचे कार्य खाजगी रुग्णालये सुध्दा जननी सुरक्षा योजनेच्या अंतर्गत जसुयो पाञ लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी मानांकित करण्यात आलेले आहेत.
