Wednesday, November 6, 2024

Aaple Sarkar Seva Kendra Registration – आपले सरकार सेवा केंद्र कसे सुरु करावे

Aaple Sarkar Seva Kendra Registration: आजच्या या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत कि आपले सरकार सेवा केंद्र/सेतू कसे सुरु करावे. आपले सरकार सेवा केंद्र ची स्थापना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 नुसार झाली आहे. सेतू केंद्र सुरु करण्यासाठी तुम्हाला काय पात्रता असणार कोणकोणती कागदपत्रे लागणार.अर्ज कसा करावा लागतो व या आपले सरकार सेवा केंद्र च्या माध्यमातून तुम्हाला रोजगाराची एक नवी संधी मिळेल व याव्दारे तुम्ही लोकांची सेवा करून चांगले पैसे कमवू शकता . या मधून तुम्ही शासकीय कामे,शासकीय प्रमाणपत्रे व आणखी बरेच कामे करू शकता. आपले सरकार सेवा केंद्र कसे सुरु करावे याची सर्व माहिती पाहूया.
सेतू केंद्र कसे सुरु करावे
आवश्यक कागदपत्रे
पात्रता
साहित्य
कोणकोणती कामे करू शकतो
#1. सेतू केंद्र कसे सुरु करावे 
Aaple Sarkar Seva Kendra Registration: सर्व प्रथम आपण सेतू केंद्र किंवा महा ई सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र हे सर्व एकाच अर्थाने वापरली जाणारे वेगवेगळी नावे आहेत म्हणजे एकच सेंटर परंतु नाव अनेक आहेत .
आपले सरकार सेवा केंद्र ची कामे स्वतः सुधा करू शकता त्यासाठी नागरिक लॉगइन देण्यात आले आहे . त्यासाठी या लिंक व क्लीक करा – https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यासाठी एक प्रोसेस असते या त्यानुसार तुम्ही हे सेंटर किंवा दुकान सुरु करू शकता व शासकीय कामे करू शकता .
सर्व प्रथम तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत किंवा जिल्हा सेतू समिती मार्फत जागा काढल्या जातात .
जिल्हा प्रशासन या जागांची वर्तमान पत्र किंवा ऑनलाईन जिल्हाच्या वेबसाईट वर प्रसिद्ध केली जाते.
जिल्हाची वेबसाईट पाहण्यासाठी तुमच्या जिल्हाचे नाव नंतर .gov.in किंवा .nic.in टाका लगेच वेबसाईट येईल. Ex. buldhana.nic.in , pune.gov.in 
जाहिरात हि गावानुसार दिले जाते . प्रत्येक गावामध्ये लोकसंख्या नुसार जागा निघते.
त्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागीवले जातात .
उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलविले जाते व काही ठिकाणी मुलाखत घेतली जाते . ( CSC चालक किंवा ग्रामपंचायत ऑपरेटर प्राधान्य दिले जाते . )
जे उमेदवार पात्र आहेत त्यांची शिक्षणा नुसार यादी प्रसिद्ध केली जाते
पात्र उमेदवारांना सेतू किंवा आपले सरकार केंद्र दिले जाते .
सेतू भेटणे म्हणजेच Maha Online ID दिला जातो त्याला VLE ID सुधा म्हणतात .
#2.आवश्यक कागदपत्रे 
आधार कार्ड
पॅन कार्ड
१० वी किंवा 12 वी मार्कशीट
शाळा सोडल्याचा दाखला
चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र
संगणक प्रमाणपत्र /MSCIT
सीएससी प्रमाणपत्र ( असल्यास )
सेंटर आतील बाहेरील फोटो ( लोकेशन सह )
भाडे करार ( जागा भाड्याने असेल तर )
#3. पात्रता  
उमेदवार ज्या गावात जागा निघाली असेल तेथील रहिवासी असावा . तेथील उमेदवार असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल .
उमेदवार शासकीय कर्मचारी नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र .
उमेदवार १० वी उतीर्ण असावा.
उमेदवाराकडे १० x १० sq जागा असावी. ( मालकीची अथवा भाडेपट्याची )
उमेदवाराकडे च्यारीत्र्य प्रमाणपत्र असेन आवश्यक .
शॉप ॲक्ट लायसेन्स किंवा ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र .
 

#4. साहित्य 
कॉम्पुटर / लॅपटॉप
बायोमेट्रिक डिव्हाइसेस
प्रिंटर
स्कॅनर
कॅमेरा
#5. कोणकोणती कामे करू शकता 
Aaple Sarkar Seva Kendra Registration: या मधून आपण शासकीय प्रमाणपत्र काढू शकतो . नैसर्गिक आपत्ती आधार प्रमाणीकरण करू शकतो .पिक विमा भरणे ,फॉर्म भरणे, अश्या प्रकारची विविध कामे करू शकता . तसेच शासकीय प्रमाणपत्रे काढू शकता . प्रमाणपत्रे थोडक्यात पाहू.
रहिवासी दाखला
उत्पन्न प्रमाणपत्र
नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र
वय, अधिवास प्रमाणपत्र
भूमिहीन प्रमाणपत्र
अल्प भूधारक प्रमाणपत्र
शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र
ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
सातबारा उतारा
लायसंस
रेशन कार्ड
पत दाखला प्रमाणपत्र
अश्या पद्धतीचे भरपूर प्रमाणपत्रे तसेच कामे या द्वारे करू शकता .



Character Certificate Online Maharashtra – असा काढा चारित्र्य दाखला

Character Certificate Online Maharashtra: चारित्र्य प्रमाणपत्र किंवा कैरेक्टर सर्टिफिकेट ( character certificate ) हे कोणत्याही व्यक्तीचे चारीत्र्य साफ आहे किंवा नाही याचे दाखला देते. यावरून समजते कि हा व्यक्ती अपराधी/ घुन्हेगार आहे किंवा नाही . या सर्टिफिकेट चे काम तुम्हाला CSC साठी ,सरकारी नोकरी साठी , शाळेसाठी ,कॉलेज साठी किंवा व्यक्तिगत कामासाठी लागते. सर्टिफिकेट कोणत्या कामासाठी पाहिजे यावर या दाखल्याचे स्वरूप असते त्यानुसार कागदपत्रांची पूर्तता करावी लागते . यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. व त्यासाठी NOC लागते ती आपण या पोस्ट मध्ये देणार आहे . कागदपत्रे कोणती लागतात ती सुधा पाहणार आहे . आपण या लेखात सोप्या भाषेत पाहणार आहे कि कश्या प्रकारे आपण च्यारीत्र्य प्रमाणपत्र /कैरेक्टर सर्टिफिकेट काढायचे .
कागदपत्रे
काढण्याची प्रोसेस
कश्यासाठी पाहिजे
असे करा ऑनलाईन अर्ज
#1. कागदपत्रे 
अर्जदाराचा पासपोर्ट फोटो
ओळखपत्र – आधार कार्ड /मतदान कार्ड /पॅन कार्ड
वयाचा पुरावा – शाळा सोडण्याचा दाखला / SSC Marksheet / जन्म प्रमाणपत्र
पत्ता पुरावा – रेशन कार्ड /लाईट बिल /भाडेकरार
NOC लेटर / कंपनी लेटर 

#2. काढण्याची प्रोसेस
Character Certificate Online Maharashtra: पोलीस व्हेरिफिकेशन काढण्यासाठी तुम्हाला कोणत्या कामासाठी पाहिजे यावर वरून त्याचे डॉक्युमेंट द्यावे लागतात . दुसरे म्हणजे ज्या ठिकाणी चारित्र्य प्रमाणपत्र द्यायचे, तेथील noc तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे तो आपण कसा करायचा समोर बघणार आहोत. आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्जामध्ये तुमची सर्व माहिती व्यवस्थित भरायची . त्यानंतर त्या फॉर्म चे पेमेंट करायचे आहे.फॉर्म ची प्रिंट तुम्हाला तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशन नेऊन सादर करायचा आहे किंवा काही ठिकाणी फिजिकल सादर करावा लागत नाही. पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट ( पीसीसी ) काढण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये तुमच गुन्हेगार रेकॉर्ड चेक केले जाते. नंतर त्याला मान्यता दिली जाते व तेथून जिल्हा पोलीस कार्यालयात मान्यता मिळते. त्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तुमचं प्रमाणपत्र मिळते. ऑनलाईन पोर्टल वर किंवा पोलीस स्टेशन मध्ये मिळेल. यासाठी साधारण तुम्हाला १५ दिवसाचा कालावधी लागतो .
3. कश्यासाठी पाहिजे 
Character Certificate Online Maharashtra: तुम्ही चारित्र्य प्रमाणपत्र काढत असाल ते कोणत्या कामासाठी पाहिजे तेथील माहिती तुम्हाला ध्यावी लागेल . तेथील पत्ता तुम्हाला फॉर्म मध्ये द्यावा लागेल. यामध्ये तुम्ही csc साठी काढू शकता किंवा नोकरी साठी काढू शकता किंवा कंपनी मध्ये देऊ शकता .

 NOC लेटर : Download
 

#4. असे करा ऑनलाईन अर्ज   
Character Certificate Online Maharashtra: तुम्हाला ज्या राज्यात काढायचे त्या प्रत्येक राज्याची प्रोसेस वेगवेगळी आहे . आपण महाराष्ट्र मध्ये कसा अर्ज करायचा हे पाहणार आहे.
सर्व प्रथम तुम्हाला या वेबसाईट यायचे आहे – https://pcs.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx
Step 1. Registration
येथे तुम्हाला Service मध्ये जाऊन Character Certificate हा ऑप्शन निवडायचा आहे. यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. तुमची वैयक्तिक माहिती व्यवस्तीत भरायची आहे.

Step 3. Login and Fill Application

Character Certificate Online Maharashtra: येथे तुम्हाला ID आणि Password टाकून लॉगइन करायचे आहे. आणि तुमची माहिती भारायची आहे . तुमचे जवळचे स्थानिक पोलीस स्टेशन निवडायचे आहे . तुमची सर्व कागदपत्रे येथे १०० kb च्या आत मध्ये अपलोड करायची आहे . फॉर्म ची फीस भरून लोकल किंवा स्थानिक पोलीस स्टेशन ला द्यायचे आहे. पोलीस स्टेशन ला मान्यता भेटल्यावर तुमचा फॉर्म जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जाईल. तेथून तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये किंवा पोर्टल वर online तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र मिळेल .


Friday, October 11, 2024

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना विविध बाबी करिता अनुदान देणारी एक महत्वाची योजना

जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना ही आदिवासी शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.4 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.1,00,000), इनवेल बोअरींग (रु.40 हजार), पंप संच (रु.40 हजार), वीज जोडणी आकार (रु.20 हजार), शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.2 लाख) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.97 हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.47 हजार), पीव्हीसी पाईप (रु.40 हजार), परसबाग (रु.5000), या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. 

पात्रता

लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी.
उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
 लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.
एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील ५ वर्षे त्याच लाभार्थ्यास किंवा कुटुंबास या योजनेचा लाभ देय नाही.


आवश्यक कागदपत्रे

नवीन विहीर 

1) जातीचा वैध दाखला
2) 7/12 व 8-अ चा उतारा
3) उत्पन्नाचा दाखला
4) लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.(100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
5) अपंग असल्यास प्रमाणपत्र
6) तलाठी यांचेकडील दाखला - सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
7) भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
8) कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
9) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
10) ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह).
11) मा. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प यांचेकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य (SCA) व घटनेच्या कलम 275 (A) अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबवण्यात येणा-या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.
12) ग्रामसभेचा ठराव.
जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंग याबाबीकरीता:

1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र/ जात वैधता प्रमाणपत्र.
2) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत ) किंवा दारिद्रय रेषेखाली असलेबाबतचे प्रमाणपत्र / BPL कार्ड (लागू असलेस).
3) जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
4) ग्रामसभेचा ठराव.
5) तलाठी यांचेकडील दाखला - एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
6) लाभार्थीचे बंधपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर).
7) कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
8) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
9) ज्या विहीरीवर जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंगचे काम घ्यावयाचे आहे त्याविहिरीचा कामा सुरू होण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह)
10) इनवेल बोअरींगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील feasibility report.
11) अपंग असल्यास प्रमाणपत्र
12) मा. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रलक्प यांचेकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य (SCA) व घटनेच्या कलम 275 (A) अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबवण्यात येणा-या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.
शेततळ्यास अस्तरीकरण / वीज जोडणी आकार / सूक्ष्म सिंचनसंच याबाबीकरीता:

1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र/ जात वैधता प्रमाणपत्र.
2) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र. (र. रु. 1,50,000/- पर्यंत ) किंवा दारिद्रय रेषेखाली असलेबाबतचे प्रमाणपत्र / BPL कार्ड (लागू असलेस).
3) जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
4) तलाठी यांचेकडील एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला. (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत)
5) ग्रामसभेची शिफारस/मंजूरी
6) शेततळे अस्तरीकरण पुर्णत्वाबाबतचे हमीपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
7) काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह)
8) विद्युत कनेक्शन व विद्युत पंपसंच नसलेबाबत हमीपत्र
9) मा. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प यांचेकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य (SCA) व घटनेच्या कलम 275 (A) अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबवण्यात येणा-या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.
10) प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकीत प्रत व मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांचेकडून अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करुन घ्यावे.


फळपिक विमा योजना

नैसर्ग‍िक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थ‍ितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेली हवामानावर आधारित फळपिक विमा योजना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचा खात्रीचा पर्याय झाला आहे. 
प्रधानमंत्री पीक वि योजनेंतर्गंत राज्याच्या कृषी विभागाकडून पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येते.

राज्यात 01 Oct पासून विविध फळपिकांचा मृगबहार सुरू होत आहे. या पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेऊन खात्रीशीर नुकसान भरपाई मिळवावी. असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 
काय आहे फळपिक विमा योजना जाणून घेऊ !

पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषी क्षेत्रासाठीच्या पत पुरवठयात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमीपासून शेतक-यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ ह्या उद्देशाने ही योजना राबविली जाते.

अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी ही योजना राबविण्यात येते. सन २०२०-२१ पासून पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे.

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेतंर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता ३० टक्के दरापर्यंत मर्यादित केला आहे. त्यामुळे ३० टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्विकारणे क्रमप्राप्त आहे. या योजनेंतर्गत ३० ते ३५ टक्के पर्यंतचे अतिरिक्त ५ टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्विकारले असून ३५ टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी प्रत्येकी ५०: ५० टक्के प्रमाणे भरावयाचा आहे. 
जास्तीत जास्त शेतक-यांना योजनेचा लाभ घेता यावा यासाठी जमीन भुधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. 

अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामा करीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. (उदा. संत्रा, मोसंब, डाळिंब व द्राक्ष) केवळ उत्पादनाक्षम फळबागानांच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. यापेक्षा कमी वयाच्या फळबाग लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल.
अंतिम मुदत ही पुढीलप्रमाणे

यासाठी या योजनेत अधिसूचित फळपिकांचे उत्पादनक्षम वय वर्षे ठरविण्यात आले आहे. यात पेरू-३, चिकू-५, संत्रा-३, मोसंबी-३, डाळिंब-२, लिबू-४, द्राक्ष-२, आंबा-५, काजू-५, सिताफळ-३ वय वर्ष उत्पादनक्षम वय ठरविण्यात आले आहे.


हे विमा संरक्षण देतांना कमी पाऊस, पावसाचा खंड, जास्त पाऊस, जास्त तापमान, आर्द्रता यानुसार विमा संरक्षण कालावधीची विभागणी करून विमा संरक्षण दिले जाते.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना 2024 साठी पिक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उप विभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच आपल्या गावातील कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांचे बरोबरच नजीकच्या बँकेशी संपर्क साधावा. 

महाराष्ट्रासाठी 

रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी : 

अहमदनगर, अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, यवतमाळ, धुळे, पालघर, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर, नंदुरबार

एचडीएपसी एर्गो जनरल इन्शुरन्स : 

बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली वर्धा, ठाणे, हिंगोली, सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर

भारतीय कृषी विमा कंपनी : 

रायगड, बुलढाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद

Friday, September 27, 2024

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान योजना)

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान योजना)
अ) स्वयं नोंदणीकृत लाभार्थी अर्जाची कार्यपद्धती -

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (पी. एम. किसान योजना) नवीन स्वयं नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना सुचित करण्यात येते की, सदर योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करताना खालील प्रमाणे कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. (सर्व कागदपत्रे २०० kb फाईल मर्यादेत अपलोड करावीत.)

१. मागील तीन महिन्यांतील डिजिटल / तलाठी सहीचा ७/१२ उतारा.

२. जमीन नोंदीचा फेरफार (लाभार्थीच्या नावे जमीन धारणा ०१/०२/२०१९ पुर्वीची असणे आवश्यक आहे. अपवाद वारसा हक्काने झालेले जमीन हस्तांतरण)
३. वारसा नोंद फेरफारवर मयत दिनांक ०१/०२/२०१९ नंतरची असल्यास ज्यांचा नावावरुन वारसाने जमीन आली त्यांच्या नावे जमीन आलेला / असलेला फेरफारही सोबत जोडावा.

४. पती, पत्नी व १८ वर्षा खालील अपत्यांचे आधार कार्ड (सर्व एकाच पानावर स्कॅन करावीत.)

वरील सर्व ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रे पडताळणी अंती सदर लाभार्थीना मान्यता मिळेल.



ब) लाभार्थी अपात्रता मागे घेण्याची कार्यपद्धती -

१) अपात्रता मागे घेण्याचा विहित नमुन्यातील अर्ज.

२) लाभार्थीचे पोर्टल वरील स्टेटस प्रिंट.

३) आधार कार्ड (पती, पत्नी व १८ वर्षांच्या आतील अपत्ये).

४) परिशिष्ट व (कृषि सहायक यांनी प्रमाणित केलेले).

५) नवीन ७/१२ व ८ अ उतारा (डिजिटल / तलाठी सहीचा).

६) वरील प्रमाणे जमीन नोंदीचा फेरफार / वारसा नोंदीचा फेरफार.

वरील सर्व अपात्रता मागे घेण्याची कागदपत्रे दोन प्रतीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावीत.

अधिक माहितीसाठी आपल्या गावच्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.