Tuesday, November 8, 2022

विहीर अनुदान योजना महाराष्ट्र 2022

Vihir Anudan Yojana Maharashtra 2022 – मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने मनरेगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचे ठरविलेले आहे. भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून 3,87,500 विहीरी खोदणे शक्य आहे.


Vihir Anudan Yojana Maharashtra 2022

मनरेगाअंतर्गत या विहिरी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास आणि त्याच्यातून उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर (ठिबक / तुषार लावून) केला गेल्यास मोठ्या संख्येने कुटुंबे लखपती होतील व पर्यायाने महाराष्ट्र राज्य दारिद्रय कमी करण्याबाबतीत केरळच्या बरोबरीकडे वाटचाल करेल. {Vihir Anudan Yojana Maharashtra 2022}

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची कामे करतांना अधिनस्त कार्यालयास येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचन विहिरींसंदर्भात पुढील सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.

लाभधारकाची निवड

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट 1 कलम 1(4) मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरीची कामे अनुज्ञेय आहेत.


अनुसूचित जमाती क) भटक्या जमाती

निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)

दारिद्रय रेषेखालील लाभार्थी

स्त्री– कर्ता असलेली कुटुंबे

शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटूंबे

जमीन सुधारणांचे लाभार्थी

इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी

अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम

2006 (2007 चा 2) खालील लाभार्थी

सिमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत भूधारणा)

अल्प भूधारक (5 एकर पर्यंत भूधारणा) [Vihir Anudan Yojana Maharashtra 2022]

लाभधारकाची पात्रता

  •  लाभधारकाकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे.
  • महाराष्ट्र भुजल ( पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम 1993 च्या कलम 3 नुसार अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये,
  • दोन सिंचन विहिरींमधील 150 मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.
  • दोन सिंचन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही Run off Zone तसेच, अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब यांकरिता लागू करण्यात येऊ नये.
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून १५० मी. अंतराची अट लागू राहणार नाही.
  • लाभधारकाच्या 7/12 वर याआधीच विहीरीची नोंद असू नये.
  • लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा. (Online)
  • एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमीनीचे क्षेत्र 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असावे.
  • ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे.

विहीरीसाठी अर्ज व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पाहण्यासाठी


Monday, November 7, 2022

बांधकाम कामगार योजना व नोंदणी याबाबत सविस्तर माहिती

न २००१ च्या जनगणनेनुसार राज्यात एकुण सुमारे १४.०९ लाख इतके बांधकाम कामगार आहेत. तथापी अधिकृत आकडेवारी जाहीर झाली नाही. सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येत १५.९९% झालेली वाढ विचारात घेता ढोबळमानाने बांधकाम कामगारांची संख्या १७.५० लाख इतकी अपेक्षित आहे.

नोंदणी पात्रता निकष


  1. १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार
  1. मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार
  2. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
    1. वयाचा पुरावा
    2. 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
    3. रहिवासी पुरावा
    4. ओळखपत्र पुरावा
    5. पासपोर्ट आकाराचे 3 फोटो 
    मंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे…

    बांधकाम कामगार नोंदणीसाठी खालील काम करणारे कामगार पात्र असतील. 

    “बांधकाम व इतर बांधकाम कार्य म्हणजे याचा संबंध निर्माण करणे, बदलणे, दुरुस्ती करणे, देखभाल करणे किंवा नाश करणे…

    • इमारती,
    • रस्त्यावर,
    • रस्ते,
    • रेल्वे,
    • ट्रामवेज
    • एअरफील्ड,
    • सिंचन,
    • ड्रेनेज,
    • तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स,
    • स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह,
    • निर्मिती,
    • पारेषण आणि पॉवर वितरण,
    • पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे
    • तेल आणि गॅसची स्थापना,
    • इलेक्ट्रिक लाईन्स,
    • वायरलेस,
    • रेडिओ,
    • दूरदर्शन,
    • दूरध्वनी,
    • टेलीग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन्स,
    • डॅम
    • नद्या,
    • रक्षक,
    • पाणीपुरवठा,
    • टनेल,
    • पुल,
    • पदवीधर,
    • जलविद्युत,
    • पाइपलाइन,
    • टावर्स
    • कूलिंग टॉवर्स
    • ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्य,
    • दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे.,
    • लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे.,
    • रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम.,
    • गटार व नळजोडणीची कामे.,
    • वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे.,
    • अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
    • वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
    • उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे.,
    • सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे.,
    • लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे.,
    • जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे.,
    • सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम.,
    • काच कापणे, काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे.,
    • कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे.,
      • सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे.,
      • स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे.,
      • सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे.,
      • जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे.,
      • माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे.,
      • रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी.,
      • सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकाम.

    नोंदणी फी- रू. 25/- व वार्षिक वर्गणी रू.60/- (5 वर्षाकरिता) व मासिक वर्गणी रु.1/-

    ऑफलाईन अर्जाचा नमुना mahabocw worker registration offline form खालील लिंक वर मिळेल

    Mahabocw worker registration offline form


    बांधकाम कामगार योजना चा अर्ज कसा करायचा हे देखील पहाBandhkam Kamgar Yojana शैक्षणिक योजना 

  3. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना १ ली ते ७ वी साठी प्रतिवर्षी रू.२५००/- किंवा इ.८ वी ते १० वी साठी प्रतिवर्षी रू.५००

  4. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ५०% किंवा अधिक गुण मिळाल्यास रू.१०,०००/-

  5. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता ११ वी व १२ वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी रू.१०,०००/-

  6. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस पदवी च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी रू. २०,०००/-

  7. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी रू.१,००,०००/- व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता रू.६०,०००/

  8. नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा पहिल्या दोन पाल्यांना शासनमान्य पदविकेकरिता प्रतिवर्षी रू.२०,०००/- व पदव्युत्तर पदविकेकरिता रू.२५,०००/-

  9. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण MSCIT करिता शुल्काची प्रतिपूर्ती. -

Bandhkam Kamgar Yojana अर्थसहाय्य योजना

  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास रू.५,००,०००/-.
  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रू.२,००,०००/-
  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराला घरखरेदी किंवा घरबांधणीकरता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील रू.६ लक्ष पर्यतच्या व्याजाची रक्कम अथवा रू.२ लक्ष अनुदान.
  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधी करिता रू. १०,०००/-. 
  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस रू.२४,०००/- (५ वर्षांकरिता) ,(प्रति वर्षी अर्ज करणे आवश्क्य राहील).
Bandhkam Kamgar Yojana सामाजिक सुरक्षा योजना

नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रु.३०,०००/-. 
व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप. 
नोंदीत बांधकाम कामगारास हत्यारे /अवजारे खरेदी करण्याकरिता रू.५०००/-. अर्थसहाय्य 
नोंदीत बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना.  
नोंदीत बांधकाम कामगारासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. 
नोंदीत बांधकाम कामगारासाठी कौशल्य वृद्धीकरण योजना.

Sunday, November 6, 2022

मोफत डिश टीव्ही आता नव्या चॅनेल


DD FreeDish

New Channel line-up on DD FreeDish, effective from April 1, 2022

डीडी  फ्रीडिश वर  एकूण 167 दूरचित्रवाणी वाहिन्या आणि 48 रेडिओ वाहिन्या उपलब्ध 

DD Free Dish DTH service is owned and operated by Public Service Broadcaster Prasar Bharati. It was launched in December, 2004. DD Free Dish is the only Free-to-Air (FTA) Direct-To-Home (DTH) Service where there is no monthly subscription fee from the viewers. It is very affordable for all as it requires only a small one time investment of about Rs. 2000/- for purchasing of Set-to-Box (STB) and small sized Dish Antenna with accessories. The unique free to air model has made DD Free Dish the largest DTH platform.

दूरचित्रवाणी सेवा वितरण उद्योगात लक्षणीय  वाढ नोंदवत43 दशलक्षहून अधिक घरांपर्यंत पोहोचलेला दूरदर्शन फ्रीडिश (  DD Free Dish )  हा  सर्वात मोठा डीटीएच  मंच बनला आहे. सुधारित लिलाव प्रक्रियांमुळे अधिक गुणवत्ता आणि विविध प्रकारच्या वाहिन्यांचे प्रमाण वाढवत 2017 आणि 2022 दरम्यान  दूरदर्शनच्या विनामूल्य डीटीएच सेवेने 2017 मधील 22 दशलक्ष वरून 2022 मध्ये 43 दशलक्ष घरांपर्यंत पर्यंत विस्तारत सुमारे 100% ची चांगली वाढ नोंदवली.

डीडी फ्रीडिश (  DD Free Dish ) सेवेने  मोठ्या संख्येच्या वाढीचा   मार्ग का आणि कशाप्रकारे सुरु ठेवला आहे याला  अलीकडेच  प्रकाशित  झालेल्या फिक्की-ईवाय अहवाल 2022 ने  पुष्टी दिली आहे की,  ''कमी खर्चिक दूरचित्रवाणी संचआर्थिक  पैलू  आणि या मंचावर नवीन वाहिन्यांची भर पडल्यामुळे या विनामूल्य दूरचित्रवाणी सेवेने आपला आधार वाढवत  43 दशलक्ष सदस्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. डीडी फ्रीडिश सेट-टॉप बॉक्सच्या विक्रीत वर्षानुवर्षे वाढ होत असल्याचे नमूद करत या अहवालात फ्रीडिश वितरकांचाही  उल्लेख करण्यात आला आहे.

2004 ते 2017 या 13 वर्षांतील 22 दशलक्ष सदस्यांच्या तुलनेतडीडी फ्रीडिशची गेल्या 5 वर्षांतील वाढ लक्षणीय  आहे.2017 ते 2022 या  केवळ 5 वर्षांमध्येफ्री डिशने  आणखी 21 दशलक्ष सदस्य जोडले असून आता ही सेवा  एकूण 43 दशलक्ष सदस्यांपर्यंत  पोहोचली आहे.

प्रसार भारतीची डीटीएच सेवा असलेली  डीडी  फ्री डिश ही एकमेव फ्री-टू-एअर (एफटीए ) डायरेक्ट-टू-होम (डीटीएच ) सेवा आहे जिथे प्रेक्षकांना  कोणतेही मासिक सदस्यत्व  शुल्क भरावे लागत नाही.डीडी फ्रीडिश सेट-टॉप बॉक्स खरेदीसाठी  केवळ एकदाच 2000 रुपयांची  छोटी गुंतवणूक आवश्यक आहे.

डीडी  फ्रीडिश सेवेच्या  यशोगाथेचे आणखी उदाहरण असे आहे की2022-23 साठी डीडी  फ्रीडिशच्या एमपीइजी -2 स्लॉट्सच्या वाटपासाठीच्या नव्या ई-लिलावामध्ये63 वाहिन्यांना  विविध प्रकारांमध्ये यशस्वीरित्या स्लॉट वाटप करण्यात आले.डीडी  फ्रीडिशच्या सदस्यता  आधारावरील वृद्धीसह डीडी  फ्रीडिशवरील वाहिन्यांची  संख्यादेखील या वर्षी अनेक श्रेणींमध्ये  वाढली आहे.बातम्या आणि चालू घडामोडींच्या श्रेणीमध्ये वाहिन्यांची संख्या 11 वरून 14 पर्यंत वाढली आहेतर हिंदी संगीतहिंदी क्रीडा वाहिनी हिंदी टेलिशॉपिंग भोजपुरी चित्रपट आणि भोजपुरी सामान्य मनोरंजन वाहिन्यांच्या संख्येत  13 वरून 16 पर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे.

डीडी  फ्रीडिश सेवा एकूण 167 दूरचित्रवाणी वाहिन्या आणि 48 रेडिओ वाहिन्या उपलब्ध करून देते यात 91 दूरदर्शन वाहिन्या (51 को  ब्रँडेड शैक्षणिक वाहिन्यांचा समावेश आहे) आणि 76 खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांचा  समावेश आहे.1 एप्रिल 2022 पासूनडीडी फ्रीडिश खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या संचात  8 हिंदी सामान्य मनोरंजन वाहिन्या15 हिंदी चित्रपट वाहिन्या 6 संगीत वाहिन्या22 वृत्त वाहिन्या9 भोजपुरी वाहिन्या4 भक्ती वाहिन्या आणि 2 परदेशी वाहिन्या असतील.

नवीन वाहिन्यांच्या समावेशामुळे डीडी फ्रीडिश संच पूर्वीपेक्षा अधिक वैविध्यपूर्ण आणि आकर्षक बनला आहे. डीडी फ्रीडिशवर प्रथमच खाद्यपदार्थांसाठी समर्पित वाहिनी शेफ संजीव कपूर यांच्या  ‘फूड फूड’ चा समावेश करण्यात आला आहे. क्रीडाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आता डीडी स्पोर्ट्स व्यतिरिक्त ‘माय कॅम ’ ही डीडी फ्रीडिशची  आणखी एक क्रीडा वाहिनी  असेल. 

डीडी  फ्रीडिशवर नवीन वाहिन्या 1 एप्रिल 2022 पासून उपलब्ध  

New Channel line-up on DD FreeDish, effective from April 1, 2022

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

 
 
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २००५-०६ पासून कार्यन्वयित करण्यात आले योजना आहे. जी पूर्वी शेतकरी जनता अपघात विमा योजना’ या नावाने राबवली जात होती.


शेती व्यवसाय करताना होणारे अपघातामुळे शेतकऱ्याला मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व येत अश्या कालावधीत शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. त्यासाठी हि योजना राबवली गेली होती , जेणेकरून अश्या गरीब शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात शासनाकडून दिला जाईल. हेच या योजनेचे प्रमुख उद्दिष्टय आहे.

शेती करताना शेतकऱ्याला अपघाती मृत्यू येतो त्याची करणे वेगवेगळी असू शकतात . जसे कि अंगावर वीज पडून मृत्यू येणे, नैसर्गिक आपत्ती , पूर, सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात, विजेचा शॉक लागून मृत्यू अश्या वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्याला अपंगत्व किंवा मृत्यू ओढवला जातो. आणि शेतकरी कुटुंबाचा आधार जातो. 

२००९-१० मध्ये या योजनेसाठी १ लाख एवढा विमा संरक्षित केला गेला होता परंतु ह्या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्ष्यात घेता २०१५-१६ मध्ये हि रक्कम वाढवून २ लाख एवढी करण्यात आली व योजनेला  ‘गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात योजना’  अश नाव देण्यात आले.

राज्यातील सर्व सातबाराधारक शेतकऱ्यांचा विमा हफ्ता शासनामार्फत भरण्यात आला असून दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. विम्याचा लाभ हा 10 ते 75 वयोगटातील शेतकऱ्यालाच मिळणार आहे. यापुर्वी ज्याचा अपघात झाला आहे त्या शेतकऱ्याचा सातबारा असणे आवश्यक होते. मात्र, यामध्ये बदल करुन जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे शेतजमिन असली तरी सहभागी होता येणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य (आई,वडिल, शेतकर्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकुण दोन जण.      

                                                
2. नुकसान भर्पाइची रक्कम-              

अ.-अपघाती मृत्यू- रु.2 लाख.

ब.अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.2 लाख                                                       

क- अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.1 लाख.                                             

3. विमा हप्ता भरावा लागत नाही- 
सर्व शेतकरी यांची विमा हप्त्याची रक्कम (प्रती शेतकरी रु.32.23 रु)  शासनामार्फत विमा कंपनीस भरण्यात येते. त्यामुळे शेतकरी यांनी विमा हप्ता भरण्याची गरज नाही. 
4. विमा पॉलिसी कालावधी- 
10.12.2021 ते 9.12.2022

आवश्यक कागदपत्र

१)७/१२
२)६क
३)६ड(फेरफार)
४)एफ. आय. आर.
५)पंचनामा
६)पोष्ट मार्टेम रिपोर्ट
७)व्हिसेरा रिपोर्ट
८)दोषारोप
१०)दावा अर्ज
११)वारसदाराचे राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तक
१२)घोषणा पत्र अ व घोषणा पत्र ब (अर्जदाराच्या फोटोसह) १३)वयाचा दाखला
१४)तालुका कृषि अधिकार पत्र
१५)अकस्मात मृत्यूची खबर
१६)घटनास्थळ पंचनामा
१७)इंनक्वेस्ट पंचनामा
१८)वाहन चालविण्याचा वैध परवाना
१९)अपंगत्वाचा दाखला व फोटो
२०)औषधोपचारा चेकागदपत्र
२१)अपघात नोंदणी ४५ दिवसाचे आत करणे

अर्ज कुठे करावा
तालुका कृषी अधिकारी कार्यालय.


विमा दाव्याच्या अनुषंगाने पुर्व सुचना अर्ज विहित कागद पत्रांसह ज्या दिनांकास तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दाखल/प्राप्त होइल व संगणक प्रणालीमध्ये अपलोड होइल त्या दिनांकासच तो विमा कंपनीस प्राप्त झाला आहे असे समजण्यात येइल.

विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह योजनेअंतर्गत विमा संरक्षित कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनेच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातांसाठी योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्या नंतर 90 दिवसां पर्यंत तालुका कृषी अधिकारी यांचेकडे प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील.

शिवाय योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्या नंतर 90 दिवसां पर्यंत संगणक प्रणाली मध्ये नोंद झालेल्या पुर्व सुचना अर्जान्वये तालुका कृषी अधिकारी यांचे कडे प्राप्त होणारे विमा प्रस्तावसुद्धा विमा पॉलिसी चा कालावधी संपल्याच्या  दिवसापासून 365 दिवसां पर्यंत स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील. मात्र सदर कालावधी नंतर कोणताही प्रस्ताव स्विकारला जाणार नाही. तसेच या संदर्भात ग्राहक मंच किंवा इतर निर्णय/आदेश शासनावर बंधनकारक राहणार नाहीत.

भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी अर्ज

भोगावटदार वर्ग1: -

जो खातेदार फार पूर्वी पासून जमिनीचा कब्जेदार असून त्याला सदर जमिन विकण्याचा पूर्ण अधिकार बहाल केला आहे. अशा जमीनींचा खातेदाराचा वर्ग 1 मध्ये समावेश होतो. या जमिनी विक्री / हस्तांतरण कामी कोणत्याही शासकीय पूर्वपरवानगीची गरज नाही. थोडक्‍यात, मुळ मालकीची वडलोपार आलेली जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये असते.

भोगावटा वर्ग 2: -

ज्या जमिनी खातेदाराला विकण्याचा अधिकार बहाल केला नाही.असा खातेदार म्हणजेच भोगवटादार वर्ग 2 होय. उदा. देवस्थान इमानी जमीन,हैद्राबाद अतियात जमिनी, वतन जमीन, वन जमीन, गायरान, पुन पुनर्वसनाच्या जमीनी व शासनाने दिलेल्या जमिनींचा समावेश होतो.अशा जमीनी विक्री साठी शासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते.

प्रारंभाच्या दिनांकास किंवा भोगवटादारास नवीन व अविभाज्य शर्तीवर/ भोगवटादार वर्ग 2 धारण केलेला असा कोणताही भोगवटा, अशा जमिनीच्या चालू बाजाराच्या पन्नास टक्के इतकी रक्कम नजराणा म्हणून शासनाला प्रधान करून भोगवटादार वर्ग एक मध्ये रूपांतर करता येईल.आणि अशा रूपांतरानंतर भोगवटादार , महारास्ट्र जमीन महसूल सहिता 1966 याच्या तरतुदी अशी जमीन भोगवटादार वर्ग 1 म्हणून धारण करील.